Pune News : स्वारगेट आगारातर्फे 'ज्योतिर्लिंग दर्शन सहली'चं आयोजन, कधीपासून होणार सुरुवात?

धार्मिक आणि पर्यटनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील स्वारगेट आगारातर्फे चार विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्यात येत आहेत. 

जाहिरात
Read Time: 1 min

धार्मिक आणि पर्यटनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील स्वारगेट आगारातर्फे चार विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्यात येत आहेत. या निमआराम बससेवांमुळे पाच ज्योतिर्लिंग, अक्कलकोट-गाणगापूर, अष्टविनायक आणि रायगड यांसारख्या प्रमुख स्थळांना भेट देणे आता सोयीचे होणार आहे. 

‘पाच ज्योतिर्लिंग' दर्शन सहल 19 ते 21 जुलैदरम्यान तीन दिवसांसाठी असेल, तर अक्कलकोट-गाणगापूर सहल 22 व 23 जुलै रोजी पार पडणार आहे. अष्टविनायक दर्शन 25-26 जुलै रोजी होईल आणि रायगड दर्शनासाठी 30 जुलै रोजी एकदिवसीय सहल नियोजित आहे. प्रत्येक सहलीसाठी निमआराम बसचा वापर केला जाणार असून, बुकिंगसाठी लवकरच अधिकृत माहिती जाहीर होणार आहे.

नक्की वाचा - Maharashtra Rain Update: राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं कमबॅक; मुंबई, पुण्यात काय आहे स्थिती?

पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद...

पुण्यातील  पर्वती, चांदणी चौक आणि वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामांमुळे 17 जुलै (गुरुवार) रोजी पुणे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. महापालिकेच्या पाणी विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. दुरुस्ती कामांनंतर 18 जुलै रोजी सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article