लोकसभा निवडणुकीतनंतर काँग्रेसला 'अच्छे दिन'; विधानसभेसाठी इच्छूकांची रांग

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पक्षाने महाविकास आघाडीत सर्वात जास्त जागा जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. काँग्रेसला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अवघी एक जागा जिंकता आली होती. 

Advertisement
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाला अच्छे दिन आले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. राज्यातील सर्व 288 जागांसाठी हे अर्ज मागवण्यात आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणूक लढण्यासाठी 1633 जणांनी अर्ज केले आहेत. सर्वाधिक अर्ज विदर्भातून आले आहेत. तर सर्वात कमी अर्ज कोकणातून आले आहेत.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पक्षाने महाविकास आघाडीत सर्वात जास्त जागा जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. काँग्रेसला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अवघी एक जागा जिंकता आली होती. 

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर अनेकांना काँग्रेसवर विश्वास दाखवत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विदर्भातून काँग्रेस पक्षाचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. विदर्भात विधानसभेच्या 66 जागा आहेत. या 66 जागांसाठी 485 अर्ज आले आहे. मात्र यामुळे जागावाटपात मोठी अडचण महाविकास आघाडीमध्ये होताना दिसून शकते. 

(नक्की वाचा - कोल्हापूर-पुणे अंतर होणार कमी, वंदे भारत एक्सप्रेसचा आज शुभारंभ; किती असणार तिकीट? )

कुठे किती अर्ज आले?

  • विदर्भ - 485 अर्ज 
  • मराठवाडा - 325 अर्ज 
  • पश्चिम महाराष्ट्र - 303 अर्ज 
  • मुंबई - 256 अर्ज
  • उत्तर महाराष्ट्र - 141 अर्ज 
  • कोकण - 123 अर्ज