Lalbaugcha Raja 2025: गणेशोत्सवास 27 सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे. गणेश चतुर्थीपासून राज्यभरात दहा दिवस गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जाईल. सध्या सर्वत्र लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. भाविक 24-24 तास रांगेमध्ये उभे राहून लालबागच्या राजा चरणी नतमस्तक होतात. राज्यासह देशातूनही भाविक या मंडळास भेट देतात. याच पार्श्वभूमीवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal) भाविकांसाठी महत्त्वाची माहिती जारी करत आवाहन केले आहे. सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर लालबागचा राजा मंडळाने फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्याबाबत भाविकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलंय. भाविकांना कोणकोणत्या सूचना करण्यात आल्या आहेत, जाणून घेऊया सविस्तर...
लालबागचा राजा मंडळाचे गणेशभक्तांना आवाहन | Lalbaugcha Raja Mandal Issues Statement On Fake Advisory
- "लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचे VIP दर्शन, विशेष पासेस किंवा शुल्क आकारत नाही."
- "सोशल मीडिया आणि काही वेबसाइट्सवर चुकीची माहिती पसरवली जात आहे."
- "कृपया अशा अफवांपासून सावध राहा. फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करा. फक्त अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवा."
- अफवांवर विश्वास ठेवू नका. सत्य माहितीसाठी आमच्या अधिकृत चॅनेल्सला भेट द्या: लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
(नक्की वाचा: गणेशोत्सवासाठी 380 विशेष फेऱ्या, 11 ऑगस्टपासून धावणार स्पेशल ट्रेन; बुकिंगबाबतची सगळी माहिती जाणून घ्या)
लालबागचा राजा मंडळाची भाविकांसाठी महत्त्वाची पोस्ट शेअर
(नक्की वाचा: Modak For Ganesh Chaturthi: गणपतीसाठी मुंबई महापालिकेची घरपोच मोदक सेवा, बुकींग फुल होण्याआधीच नोंदवा ऑर्डर)