
गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच, बृहन्मुंबई महानगरपालिकेशी (BMC) संलग्न असलेल्या महिला बचत गटांनी (SHGs) यंदाच्या गणेशोत्सवासाठी एक विशेष आणि अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुंबईकरांना अस्सल चवीच्या मोदकांचा आस्वाद घेता यावा यासाठी ‘मोदक महोत्सव 2025'चे (Modak Mahotsav 2025) आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेले पारंपारिक उकडीचे तसेच तळलेले मोदक मुंबईकरांना घरपोच उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
नक्की वाचा: आंब्याचे उकडीचे मोदक, जाणून घ्या साधीसोपी रेसिपी VIDEO
बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनेक वर्षांपासून महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत. ‘मोदक महोत्सव 2025' हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. या उपक्रमामुळे बचत गटातील महिलांना त्यांच्या पाक कौशल्याचा उपयोग करून व्यवसाय करण्याची संधी मिळाली आहे. गणेशोत्सवात मोदकांची मागणी प्रचंड असते, याचा फायदा घेत बचतगटातील महिलांना लाभ करून देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक चांगला उपक्रम सुरू केला असून, विविध सणांना गोडधोड पदार्थ आणि इतरही खाद्यपदार्थ या महिला बचतगटांतर्फे तयार करून ते घरपोच पोहचवले जातात. यामुळे महिलांना उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत तयार झाला असून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागण्यास मदत होत आहे.
नक्की वाचा: Sankashti Chaturthi Full List 2025: संकष्टी चतुर्थीची संपूर्ण यादी
मोदकासाठी ऑर्डर कशी नोंदवाल ? (How to Order Modak Online?)
या महोत्सवामध्ये विशेषतः पारंपारिक उकडीचे मोदक तसेच तळलेल्या मोदकांवर भर देण्यात आला आहे. हे मोदक महिला बचतगटातील महिलांनी तयार केलेले असणार आहेत. मोदक तयार करत असताना त्यांचा चव आणि दर्जा चांगला असेल याची खात्री बाळगण्यात येते. मुंबईकरांना मोदक मागवण्यासाठी 21 ते 25 ऑगस्ट 2025 या कालावधीत ऑर्डर नोंदवता येणार आहे. ऑर्डर नोंदणीसाठी https://shgeshop.com ही वेबसाइट उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या महोत्सवातील मोदकांच्या होम डिलिव्हरीसाठी कोणत्याही प्रकारचे डिलिव्हरी शुल्क आकारले जाणार नाही. मोदकांची होम डिलिव्हरी 27 ऑगस्ट 2025 रोजी केली जाणार आहे, जेणेकरून गणरायाच्या आगमनापूर्वी तुम्हाला मोदक मिळू शकतील.
🙏गणपती बाप्पा मोरया!
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 20, 2025
🌟 गणेशोत्सव २०२५ साठी खास!
🌟बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महिला बचतगट प्रस्तुत करीत आहेत ‘मोदक महोत्सव २०२५'
✅ ऑर्डर कालावधी: २१–२५ ऑगस्ट
✅ घरपोच वितरण: २७ ऑगस्ट
✅ स्वादिष्ट पारंपरिक उकडीचे तसेच तळलेले मोदक
✅ थेट महिला उद्योजिकांकडून आपल्या… pic.twitter.com/mOTqpLT0Qj
मुंबईकरांसाठी खूशखबर
पारंपरिक मोदक बनवणे ही एक कला असून मोदक बनविण्यासाठी बराच वेळ लागतो. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना उकडीचे मोदक बनविणे शक्य होत नाही. अशा वेळी महिला बचत गटांनी तयार केलेले घरगुती पद्धतीचे मोदक उपलब्ध झाल्यामुळे गणेशोत्सवाचा पारंपरिक गोडवा टिकून राहील. मुंबई महानगरपालिकेचा हा उपक्रम समाजाला एकत्र आणणारा आणि महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणारा एक यशस्वी प्रयत्न ठरेल अशी आशा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world