गणपतीसाठी कोकणात गावाला निघालात! मुंबई-गोवा हायवेची काय आहे स्थिती?

मुंबई - गोवा महामार्गावरून जाणाऱ्यांची संख्या त्यात जास्त आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी रात्री पासून मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहेत.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

गणपती दोन दिवसावर आले आहेत. चाकरमानी गणपतीसाठी मुंबईतून कोकणाकडे निघाले आहे. गुरूवारी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणच्या दिशेने निघाले आहेत. मुंबई - गोवा महामार्गावरून जाणाऱ्यांची संख्या त्यात जास्त आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी रात्री पासून मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहेत. रस्त्यात असलेले खड्डे, रस्त्याची सुरू असलेली कामं यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रागा सध्या मुंबई गोवा महामार्गावर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे गावी पोहोचण्यास चाकरमान्यांना उशिर होत आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई गोवा महामार्गावर  वाकण फाटा, सुकेळी खिंड, कोलाडनाका, इंदापूर, माणगाव, लोणेरे फाटा, लाखपाले ते महाड पर्यंत जागोजागी वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.  कोलाडनाका व लोणेरे नाका इथे चालू असलेले पुलाच्या कामामुळे ही वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय अनेक ठिकाणी रस्त्यात जागोजागी खड्डे पडले आहे. ते भरण्याचे काम ही सुरू आहे. त्यासाठी ठेकेदाराची वाहनंही त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे गाड्यांची एकच गर्दी होत आहे. दोन दिवस चाललेला एस टी संप बुधवारी संध्याकाळी मिटला. हा संप कधी मिटेल यावर अवलंबून न राहता अनेक जण खाजगी वाहनाने कोकणात निघाले आहेत. लवकर घरी याता यावे या उद्देशाने निघालेले चाकरमानी मात्र या वाहतूक कोंडीमुळे अडकून पडल्याची स्थिती आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - चिमुकल्यांचा मृतदेह आईबापानं खांद्यावर घेतला, 15 किलोमीटरची पायपीट 'त्या' लेकरांबरोबर काय झालं?

मागील 17 वर्षा पासून मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनही पुर्ण झालेले नाही. रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवात मडगाव पर्यंत 417 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. मात्र या रस्त्याला कोणीही वाली नसल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे. चारपदरी रस्त्याचे काम हातात घेण्यात आले. 2011 साली याला मान्यता देण्यात आली. सिमेंटचा रस्ता करण्याचे ठरले होते. त्यासाठी 2024 उजाडले तरी सिमेंटचा रस्ता सोडा रस्त्यात असलेले खड्डेही निट बुजवले गेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. हा रस्ता व्हावा यासाठी अनेक आंदोलने झाली. पत्रकारांनीही उपोषण केले. पण त्यांना केवळ आश्वासन मिळाले. 15 ऑगस्ट रोजी मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीने सहा दिवस आमरण उपोषण केले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'एकाच महिलेला किती पदे देणार? पक्षात इतरही कर्तृत्वान महिला' रूपाली ठोंबरे का भडकल्या?

गणपती पुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुंबई गोवा महामार्गाची पाहीणी केली. त्यासाठी त्यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी जागो जागी नागरिकांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना व्यथा सांगितल्या. हा महामार्ग पुर्ण होत नसल्यामुळे अनेक अपघातही झाले आहे. मागील 17 वर्षात 5,500 पेक्षा जास्त अपघात होऊन 3000 पेक्षा जास्त नागरिकांनी जीव गमावला आहे.  तर अनेक जण जखमी झाले आहेत.  त्यामुळे अखेर मुख्यमंत्री शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावुन काम रखडवण्याऱ्या ठेकेदारा विरोधात सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार  ठेकेदार चेतक एंटरप्रायजेस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना अटक ही करण्यात आली होती. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - आरोग्य मंत्र्यांसाठी परांड्याची वाट बिकट? करेक्ट कार्यक्रम कोणाचा होणार?

त्यानंतर ज्या ठिकाणी रस्त्याची स्थिती खराब होती. खड्डे पडले होते त्या ठिकाणी ते बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले. पनवेल, पळस्पा, कर्नाळा, पळस्पा, खारपाडा, जिते, आंतोरा, पेण, वडखळ, गडब, कासु, नागोठणे, वाकणफाटा, सुकेळी खिंड, पुई, कोलाडनाका,  कोलाड रेल्वे स्टेशन, ते इंदापूरपर्यंत हे काम सुरू होते. पण त्याच काळात पुन्हा पाऊस झाला. बुधवार पासून महामार्गावर वाहतूक वाढली. त्यामुळे पुन्हा खड्ड्याची समस्या पुढे आलीच. त्यातून आता वाहतूक कोंडी होताना दिसत आहे.