विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी महायुतीत एकमत झाले असल्याचे समजते. त्यानुसार भाजप 6, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रावादी अजित पवार गट प्रत्येकी 3 जागा वाट्याला येणार आहेत. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी होवू नये यासाठी काहींना राज्यपाल नियुक्त म्हणून संधी दिली जाणार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडू तीन जणांची नावे समोर येत आहेत. त्यात महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नाव असल्याची माहिती आहे. याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दुसऱ्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी कडक शब्दात आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे अजित पवारां समोर पेच निर्माण झाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला राज्यपाल नियुक्त आमदारांच्या 12 जागां पैकी 03 जागा मिळणार आहेत. त्यासाठी अजित पवारांनी तीनही जणांनी नावे फायनल केल्याचे समजते. त्यात माजी खासदार आनंद परांजपे, मुंबई बँकेचे सिद्धार्थ कांबळे यांचा समावेश आहे. तिसरे नाव हे रुपाली चाकणकर यांचे आहे. रूपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. शिवाय त्यांच्याकडे राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही आहे. त्यात त्यांना आता विधान परिषदेवरही पाठवले जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दुसऱ्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांना नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय या निर्णयाचा पुनर्विचार करावा असे आवाहन केले आहे.
ट्रेडिंग बातमी - कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण बाजी मारणार? महाडिक विरुद्ध पाटील सामना रंगणार
याबाबत रूपाली ठोंबरे यांनी एक फेसबुक पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यात त्या म्हणतात, 'एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे मा.अजित दादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. असं म्हणत पुढे त्या म्हणतात, 'एकाच महिलेला किती पदे देणार?' काल पासून बातमी वाचत आहे, बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले. त्यावर पक्षाला कळकळीची विनंती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत, त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तृत्वान महिला खूप आहेत. त्या सक्षम,काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा. इतर महिलांना समान संधी द्यावी. ही विनंती असेल. असे रूपाली ठोंबरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यातून त्यांनी रूपाली चाकणकर यांना विरोधही दर्शवला आहे.
ट्रेंडिंग बातमी - भास्कर जाधवांना गुहागरमध्ये कोणाचं आव्हान? स्वत: लढणार की मुलासाठी जागा सोडणार?
दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुतीत बंडखोरी होवू नये म्हणून काहींना विधान परिषदेवर संधी दिली जाणार आहे. रूपाली चाकणकर या खडकवासला विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. मात्र इथं भाजपचे भिमराव तापकीर हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळेच चाकणकर यांची विधान परिषदेवर वर्णी लावून त्यांची नाराजी दुर करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभेला कोणताही दगाफटका नको यासाठी महायुतीतले नेते काळजीपूर्वक निर्णय घेत आहेत.
ट्रेंडिंग बातमी - आरोग्य मंत्र्यांसाठी परांड्याची वाट बिकट? करेक्ट कार्यक्रम कोणाचा होणार?
त्याचाच एक भाग म्हणून भाजपनेते हर्षवर्धन पाटील यांचीही विधान परिषदेवर वर्णी लावली जाण्याची दाट शक्यता आहे. पाटील हे इंदापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र ही जागा राष्ट्रवादीची आहे. तिथे दत्ता भरणे हे सध्या विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे त्यांना डावलून हर्षवर्धन पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांचीही नाराजी दुर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर पाठवले जाईल अशी चर्चा आहे. विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांनी पक्ष सोडून जावू नये यासाठी महायुतीत प्रयत्न सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world