घाटकोपर होर्डिंग कोसळल्याच्या घटनेला 13 मे रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या दुर्घटनेत अनेक जणांचा हकनाक बळी गेला. याच दिवशी पुण्यात मोठी दुर्घटना टळली आहे. मेट्रो उभारणीदरम्यान एक महाकाय लोखंडी सांगाडा कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र वर्दळीच्या वेळी ही दुर्घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोसाठी उभारल्या जात असलेल्या पिलरचा महाकाय लोखंडी सांगडा कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. पिंपरी ते निगडी दरम्यान मेट्रोची नवीन उन्नत मार्गिका उभारली जात आहे. त्यासाठी पिलर टाकले जात होते. यावेळी एक पिलर उभारताना कित्येक टन वजनाचा सांगाडा कोसळला.
नक्की वाचा - Sand Mafia : संतापजनक, वाळू माफियांवर कारवाईवर गेलेल्या पोलिसाला ट्रॅक्टरने चिरडलं
या घटनेनं मेट्रो कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मात्र याहूनही धक्कादायक बाब म्हणजे या घटनेचा कोणताही पंचनामा न करता आणि महामेट्रोचे अधिकारी अनुपस्थित असताना पडलेला सांगाडा ठेकेदाराने परस्पर काढून घेण्याचं काम केलंय.