जाहिरात

Gold-Silver Price : सोन्या-चांदीचं मार्केट डाऊन! 'इतक्या' रुपयांनी झाली मोठी घसरण, पुढील 3 महिन्यात..

सोन्या-चांदीच्या किंमतीत या आठवड्यात चढ-उतार झाल्याचं पाहायला मिळालं.अमेरिका-इराण यांच्यातील बदलत्या परिस्थितीचा परिणाम थेट कमोडिटी मार्केटवर झाल्याचं समोर आलंय.

Gold-Silver Price : सोन्या-चांदीचं मार्केट डाऊन! 'इतक्या' रुपयांनी झाली मोठी घसरण, पुढील 3 महिन्यात..
Gold And Silver Price Latest Update

Gold And Silver Price Latest Update : सोन्या-चांदीच्या किंमतीत या आठवड्यात चढ-उतार झाल्याचं पाहायला मिळालं.अमेरिका-इराण यांच्यातील बदलत्या परिस्थितीचा परिणाम थेट कमोडिटी मार्केटवर झाल्याचं समोर आलंय.सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीने ग्राहकांपासून मोठ्या गुंतवणूकदारापर्यंत सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का? की सोन्याच्या किंमतीत आणखी घट होईल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

या पाच दिवसात कशी राहील सोन्या-चांदीची स्थिती?

इंडिया बुलियन एंड ज्वेलर्स असोसिएशनच्या रिपोर्टनुसार, या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या किंमतीत 2976 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.43 लाख रूपयांवर घसरला आहे.मागील आठवड्यात सोनं 1.46 लाख रुपयांवर ट्रेंड करत होतं.फक्त सोनंच नाही,तर चांदीची चमकही या आठवड्यात फिकीच राहिली.चांदीचे दर  2.34 लाख रुपये प्रति किलोग्रॅमने घसरून 2.20 लाख रुपयांवर पोहोचले.म्हणजेच या एका आठवड्यातही चांदी 13,468 रुपयांवर घसरली आहे. जून महिन्यातही सोनं 15000 रुपये आणि चांदी 38000 रुपयांनी स्वस्त झाली होती.

नक्की वाचा >> Shirdi News: "आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर", शिर्डीत नितेश राणे भडकले, म्हणाले, "हिंदू तरुणांनी.."

वर्ष 2026 मध्ये सोन्या-चांदीची चाल एखाद्या रोलर-कोस्टर राईडसारखी राहिली आहे. 31 डिसेंबर 2025 ला सोनं 1.33 लाख रुपयांवर होतं.जे 29 जानेवारीला ऑल टाईम हाय 1.76 लाखांवर पोहोचलं.पण तेव्हापासून आतापर्यंत सोनं जवळपास 33000 रुपयांपर्यंत स्वस्त झालं आहे.चांदीच्या भावातही मोठी घसरण झाली आहे.31 डिसेंबर 2025 ला चांदी 2.30 लाख रुपयांवर होती. जी 29 जानेवारीला 3.86 लाख ऑल टाईम हायवर पोहोचली आहे. पण या 160 दिवसांमध्ये चांदी हाय लेव्हलपासून 1.66 लाख रुपये प्रति किलोपर्यंत घसरली आहे.

पुढील तीन महिन्यात सोन्या-चांदीचे दर काय असतील?

केडिया एडव्हायझरीचे सीनियर रिसर्च एनालिस्ट अमित गुप्ता यांनी म्हटलंय की,एमसीएक्स सोन्याला 1 लाख 35 हजार रुपयांपर्यंत सपोर्ट मिळेल.म्हणजेच घसरणीच्या स्थितीतही ही लेव्हल कमी होण्याची शक्यता कमी आहे.दरवाढीबाबत बोलायचं झालं, तर पुढील तीन महिन्यांमध्ये सोन्याची किंमत 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

नक्की वाचा >> Ratnagiri News : जगबुडी नदीचा पूर ओसरला, पण 'ते' संकट मात्र कायम, पाण्यात फिरतेय खतरनाक आकृती

लोकांसाठी आहे सूवर्ण संधी

केडिया एडवायझरीचं म्हणणं आहे की,गुंतवणूकदारांसाठी ही घसरण एक मोठी संधी आहे.जे लोक वाढलेल्या किंमतीमुळे सोनं खरेदी करू शकत नव्हते,त्यांच्यासाठी मार्केटमध्ये एन्ट्री करण्याची योग्य वेळ आहे.दरम्यान, एकाच वेळी सर्व पैसे गुंतवण्याची चुकी त्यांनी करू नये, याबाबत त्यांनी काळजी घ्यावी.

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com