गेल्या काही दिवसापासून सोन्या बरोबर चांदीच्या भावातही मोठी वाढ होताना दिसत होती. मात्र आज गुरूवारी 23 मे रोजी ही स्थिती बदलली आहे. सोन्या आणि चांदीच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याच्या भावात बाराशे रुपयांची तर चांदीच्या भावात तब्बल तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या महिन्याभरापासून सातत्याने सोन्या चांदीच्या भावात वाढ होत आहे. मात्र आज सोन्या चांदीच्या भावात घसरण झाली आहे. जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे भाव 72 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला आहे. तर चांदीचे भाव 90 हजार रुपये प्रति किलो इतके झाले आहे.
हेही वाचा - IIT उत्तीर्ण तरीही बेरोजगार; यंदा 38 % आयआयटीयन्सना प्लेसमेंट नाही!
खरंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर घडत असलेल्या घडामोडींचा प्रभाव सोन्या-चांदीच्या भावावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही घसरण काही काळासाठी असू शकते असं देखील मत व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे पुन्हा सोन्या चांदीच्या भावात वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र काही प्रमाणात सोन्या चांदीचे दर कमी झाल्याने सोने खरेदी करू इच्छीणाऱ्यांसाठी दिलासा देणारा बाब आहे. शिवाय लग्नसराई पाहात लग्नासाठी दागिने घेणाऱ्यांसाठीही जमेची बाजू मानली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world