Golden Metro : मुंबईचा कायापालट निश्चित! 30 मिनिटात सांताक्रूझ ते नवी मुंबई; विमानतळांना जोडणारा भव्य प्रकल्प

सिडको आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एकत्रितपणे 15 हजार कोटींचा गोल्डन मेट्रोचा मार्ग उभारणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Golden Metro Project : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जाण्यासाठी मेट्रो उभारण्यात येणार आहे. दोन विमानतळाला जोडणाऱ्या या मार्गिकला गोल्डन मेट्रो म्हटलं जात आहे. या गोल्डन मेट्रो मार्गिका क्रमांक 8 याची निविदा जारी करण्यात आला आहे. या मार्गिकेवर कमी थांबे असतील त्यामुळे हा मार्ग विमानतळ एक्स्प्रेस मार्गिका म्हणून ओळखला जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठण्यासाठी साधारण 45 किलोमीटर अंतर आहे. हा पट्टा पार करण्यासाठी जवळपास दीड ते पावणे दोन तास लागतात. या गोल्डन मार्गिकेमुळे अवघ्या 30 मिनिटात एका विमानतळावरुन दुसऱ्या विमानतळापर्यंत पोहोचता येणार आहे. या मार्गिकेतील काही भाग भुयारी तर काही उन्नत मार्ग असेल. 

किती खर्च?

सिडको आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एकत्रितपणे 15 हजार कोटींचा गोल्डन मेट्रोचा मार्ग उभारणार आहेत. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा पहिला मेट्रो असल्याने तो जलद गतीने बांधण्यावर भर देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2026 च्या मध्यापासून बांधकामास सुरुवात होणार आहे आणि 2028 पर्यंत हा मार्ग पूर्ण होण्याचा अंदाज आहे. हा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल दोनपासून सुरू होईल. छेडानगरपर्यंत भुयारी मार्ग आणि त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत उन्नत मार्ग असेल. 

Advertisement

नक्की वाचा - Mumbai Metro One Ticket : एकाच तिकिटावर 4 मेट्रो मार्गांवरुन प्रवास, तिकीट कुठे बुक कराल? दर स्वस्त होणार?

सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प विकसित केली जाणार असून यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 

काय फायदा होईल?

एक विमानतळ हे देशांतर्गत आणि दुसरं विमानतळ हे आंतरराष्ट्रीय होणार असं सांगण्यात येतंय.असं झाल्यास देशांतर्गत विमानतळावरुन आलेल्या प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमान गाठण्यासाठी दुसऱ्या विमानतळावर जावं लागेल. अशावेळी रस्तेमार्गाने जायचं झाल्यास यासाठी दीड ते पावणे दोन तास लागतील. आणि ऑफिस सुटण्याच्या वेळी हा काळ अधिक वाढेल. मात्र नव्या मार्गामुळे अवघ्या अर्ध्या तासात एका विमानतळावरुन दुसरं विमानतळ गाठता येणार आहे. 

Advertisement

महत्त्वाची स्थानकं..

कुर्ला
लोकमान्य टिळक टर्मिनस
मानखुर्द 
वाशी
नेरूळ
बेलापूर