जाहिरात

Mumbai Metro One Ticket : एकाच तिकिटावर 4 मेट्रो मार्गांवरुन प्रवास, तिकीट कुठे बुक कराल? दर स्वस्त होणार?

आता एकाच तिकिटावरुन चारही मेट्रो मार्गिकांवरुन प्रवास करता येणार आहे.  

Mumbai Metro One Ticket : एकाच तिकिटावर 4 मेट्रो मार्गांवरुन प्रवास, तिकीट कुठे बुक कराल? दर स्वस्त होणार?

one ticket for four metro lines : मुंबई आणि उपनगरांमध्ये मेट्रोचं जाळं पसरवलं जात आहे. वाहतूक कोंडीवर मेट्रोमुळे मोठा दिलासा मिळत आहे. दिल्लीमधील मेट्रोमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. त्याच धर्तीवर मुंबई आणि उपनगर मेट्रोने जोडण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये चार मेट्रो मार्गिका सुरू आहेत. आता एकाच तिकिटावरुन चारही मेट्रो मार्गिकांवरुन प्रवास करता येणार आहे.  

मुंबई आणि उपनगरातील मेट्रो मार्गिका (one ticket for four metro lines)

१ घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो 1 
२ दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ
३ दहिसर-गुंदवली मेट्रो 7 
४ आरे-आचार्य अत्रे चौक 

सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये वरील चार मेट्रोच्या मार्गिका सुरू आहेत. या मार्गिकांवरुन प्रवास करताना प्रवाशांना तिकीट सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावेत यासाठी एमएमओसीएलने स्वीक्वेलस्ट्रगिं कंपनी आणि एमएसओसीएलने वन तिकीट अ‍ॅप सुरू केलं आहेय ओपन नेटवर्क फॉर डिजिटल या नेटवर्कवर हे अॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. 

Latest and Breaking News on NDTV

कसं कराल तिकीट बुक (One Ticket App service)

प्रवासी प्ले स्टोअरवरुन हे अॅप डाऊनलोड करू शकता. हे अ‍ॅप वापरण्यासाठी अत्यंत सोपे आहे. विशेष म्हणजे विविध मार्गिकांनुसार वेगवेगळे विभाग करण्यात आलेले नाही. याचा अर्थ दहिसर पूर्व मेट्रो स्थानकावरुन तु्म्हाला वरळीपर्यंत प्रवास करायचा असेल तर तीन मार्गिकांसाठीच्या तीन तिकीट काढण्याची गरज भासणार नाही. तुम्ही या अॅपवर रूट निवडणून तिकीट बुक करू शकता. जर तुम्ही दहिसर पूर्व मेट्रो ते वरळी मेट्रो अशी स्थानकं बुक केली तर याचं तिकीट १०० रुपये होतील. हे पैसे तु्म्ही कार्ड, नेटबँकिंग, UPI च्या माध्यमातून देऊ शकता.  

दहिसर (पूर्व) - गुंदवली - 30 रुपये तिकीट
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे - मरोळ नाका - 20 तिकीट
मरोळ नाका - वरळी - 50 रुपये तिकीट 

या तिन्ही मार्गिकांचं तिकीट एकाच वेळी वन अ‍ॅप या अ‍ॅपवरुन काढता येईल. एकाच वेळी तिकीट काढता येणार असले तरी तिकीट दरात अद्याप तरी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तीन मार्गिगांचे तिकीट एकत्र काढले तरी कोणतीही सवलत मिळणार नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com