मनोज सातवी, पालघर
गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणारी मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे. पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीचे काही डबे रुळावरून घसरले आहे. पश्चिम रेल्वेच्या वाहतूकीवर याचा परिणाम झाला असून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर स्थानकातून मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर काही वेळातच ही मालगाडी रुळावरुन घसरली. विरारहून डहाणूच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीने सुरू आहेत.
( नक्की वाचा : 'ती' कोण होती? महिलेसोबत फ्लॅटमध्ये जाताच फसले बांगलादेशचे खासदार, मृतदेहच बाहेर आला )
गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांना डहाणूपर्यंत सर्व स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. गार्डचा डबा आणि आणखी सहा डबे रुळावरून घसरले आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी अंदाजे 7 ते 8 तास लागण्याची शक्यता आहे.