इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी खुशखबर आहे. ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक वाहनं आहेत त्यांच्यासाठी स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही टोल माफी काही मार्गांवरच असल्याच ही सरकारमार्फत स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. शिवाय इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठीही या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार आहे.
नक्की वाचा - Marathi Ekikaran Samiti: अचानक प्रकाशझोतात आलेली मराठी एकीकरण समिती काय काम करते?
इलेक्ट्रिक वाहनांना राज्यातल्या तीन मोठ्या एक्सप्रेस वे वर टोल फ्री प्रवास करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबईचा अटल सेतू यांचा यात समावेश आहे. या मार्गावरून आता ही इलेक्ट्रिक वाहनं टोल न भरता प्रवास करू शकतील. त्यांना टोल माफी देण्याय येणार आहे. 15 ऑगस्टपासून ते या मार्गावर टोल फ्री प्रवास करू शकतात. याबाबतची अधिसूचना उद्या (14 ऑगस्ट 2025) निघणार असल्याची माहिती ही समोर येत आहे.
इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करावी यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. त्यामुळे या वाहनांवर असलेल्या टॅक्समध्ये ही सरकारने मोठी सूट दिली होती. पेट्रोल डिझेलच्या वाढणाऱ्या किंमती. त्यातून होणारं प्रदूषण या सर्व गोष्टी पाहाता सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन देत आहेत. येणाऱ्या काळात जर इलेक्ट्रिक वाहनं वाढली तर त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. शिवाय इंधनाचीही बचत होणार आहे. आता टोल फ्री प्रवास केल्याचा ही चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे.