जाहिरात

Marathi Ekikaran Samiti: अचानक प्रकाशझोतात आलेली मराठी एकीकरण समिती काय काम करते?

या संघटनेनं आतापर्यंत अनेक कामं मार्गी लावल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केला आहे.

Marathi Ekikaran Samiti: अचानक प्रकाशझोतात आलेली मराठी एकीकरण समिती काय काम करते?
मुंबई:

दादरच्या कबुतरखान्या विरोधात मराठी एकीकरण समितीने आंदोलन केले. मराठी माणसासाठी ही संघटना पुढे आली. त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला गेला. पण हे आंदोलक मागे हटले नाहीत. एकीकडे मराठीचे कैवारी असल्याचं सांगणारे पक्ष या आंदोलनापासून दूर राहीले. त्याच वेळी मराठी एकीकरण समिती मैदानात उतरली. त्यामुळे ही समिती अचानक प्रकाशझोतात आली. मराठीजनांनमध्येही या संघटनेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ही घटना कुणाची आहे? ही संघटना काय काम करते? या संघटनेची स्थापना कधी झाली आणि कशासाठी झाली याबाबत माहिती शोधली जात आहे. या संघटनेची सर्व माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. 

मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दादरच्या कबुतरखान्यात आंदोलन केलं. त्यानंतर ही संघटना चर्चेत आली. मराठी एकीकरण समिती (Marathi Ekikaran Samiti) ही महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषा आणि अस्मितेसाठी लढणारी एक  बिगर राजकीय लोकचळवळ आहे. ही लोकचळवळ मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी माध्यमातील शाळांचे संवर्धन, मराठी माध्यमातील शिक्षण, मराठी रोजगार आणि व्यवसाय यांसाठी कार्यरत आहे.  या लोकचळवळ संघटनेची स्थापना 6 जून 2015 साली झाली आहे. तिथपासून आजपर्यंत ही बिगर राजकीय लोकचळवळ संघटना महाराष्ट्रात मराठीच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यरत आहे.  महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावावरून हे नाव देण्यात आले.  

Latest and Breaking News on NDTV

नक्की वाचा - Dadar kabutar Khana: मुंबईतील कबुतरखान्यांवरील बंदी कायम, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

“एकच ध्येय, एकच ध्यास, मराठी भाषा, मराठी शाळा, राज्य संस्कृतीचे संवर्धन व विकास” हे मराठी एकीकरण समिती या संघटनेचे ब्रीदवाक्य आहे. संघटनेचे मूळ ध्येय मराठी माणसांना एकत्र आणून उद्योग क्षेत्रात मराठी माणसाची मोठी फळी उभारावी हे आहे. राज्यात होणाऱ्या मराठी भाषेच्या गळचेपी विरोधात आवाज उचलण्यासाठी कायदेशीर लढा देणे, आंदोलने करणे, मराठी हा विषय राजकारणापुरता नसून राजकारणाचा वापर मराठी संवर्धनसाठी केला पाहिजे हे संघटनेचे धोरण आहे. ही संघटना सर्व राजकीय पक्षांना, राज्यातील जनतेला मराठी भाषेविषयी, मराठी शाळांविषयी जागरूक करण्याचे काम करत आहे. या महाराष्ट्रात धर्म, जात, राजकीय पक्ष बाजूला ठेवून मराठीसाठी कार्य करणारी ही बिगर राजकीय संघटना आहे. मराठी एकीकरण समिती संघटनेची सध्या 22,000 हून जास्त सभासद आहेत. विविध पातळीवर मराठीच्या न्याय्य हक्कांसाठी ते कार्यरत आहेत. संघटनेचे मार्गदर्शक माजी आय एफ एस अधिकारी, माजी पोलीस अधिकारी, काही कायदेतज्ज्ञ तसेच सामाजिक क्षेत्रातील काही मोठी नेते मंडळी आहेत.

नक्की वाचा - Dadar Kabutarkhana: मराठी माणसाच्या आंदोलनात NDTV मराठीच्या पत्रकारांना पोलिसांची धक्काबुक्की

या संघटनेचे ऑनलाईन पद्धतीने सदस्य होता येते. https://marathiekikaransamiti.org  ही संघटनेची वेबसाईड आहे. त्यावर तुम्ही सदस्य नोंदणी करून शकता. त्यासाठी नाममात्र फी ही घेतली जाते. सदस्य होण्यासाठी संघटनेची काही नियम आणि अटी आहेत. त्यात संघटनेचे प्राथमिक सदस्यत्व केवळ मराठी भाषिकांना दिले जाईल. जुने स्थायिक मराठी भाषा संस्कृती जोपासणारे, 1960 चा रहिवास असलेल्यांना सुद्धा ते दिले जाईल. संघटनेच्या कामकाजात कोणताही राजकीय हस्तक्षेप करू दिला जाणार नाही. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांस राजकीय निवडणूक लढवायची असल्यास पदाचा राजीनामा द्यावा लागेल व राजकीय पक्षातील पदाधिकारी यांना संघटनेचे पदाधिकारी होता येणार नाही, मार्गदर्शक म्हणून नेमणूक होईल.

नक्की वाचा - संताप...संताप...संताप! कोर्टाचा अवमान करणाऱ्या जैनांना सोडून दिले, जाब विचारणाऱ्या मराठीजनांना पकडले

या संघटनेनं आतापर्यंत अनेक कामं मार्गी लावल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केला आहे. जी ईडी सर्वांना नोटीस पाठवते त्यांनाच मराठी एकीकरण समितीने नोटीस पाठवली होती असं ही त्यांनी सांगितले आहे. या नोटीसनंतर मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयाचा बोर्ड मराठीत करण्यात आला होता असा दावा ही त्यांनी केला आहे. या शिवाय क्रिकेटचे समालोचन मराठीत करण्या मागे ही समितीचाच हात असल्याचं त्यांनी सांगितलं. मोबाईल फोनवरील मराठीकरण ही संघटनेनं केल्याचं ते म्हणाले. शाळांमध्ये हिंदी सक्ती या विरोधात खूप आधी पासून आपल्याच संघटनेनं काम सुरू केलं होतं. लोकांमध्ये जनजागृती केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला. त्यानंतर सर्व स्तरातून उचलली गेली. याच चळवळीमुळे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले असंही त्यांनी सांगितलं.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com