Film City in Nashik: नाशिकच्या इगतपुरीत उभारणार फिल्म सिटी, जमिनीलाही मंजुरी; काय आहे सरकारचा प्लान?

इगतपुरीसारख्या डोंगराळ भागात फिल्म सिटी उभी राहिल्याने उत्तर महाराष्ट्रात चित्रपट निर्मितीला मोठे प्रोत्साहन मिळेल. सोमवारी झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅबिनेट सदस्य छगन भुजबळ आणि आशिष शेलार हे देखील उपस्थित होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

New Film City in Nashik:  मुंबईतील 'फिल्म सिटी'च्या धर्तीवर आता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे लवकरच एक नवीन चित्रनगरी उभी राहणार आहे. महाराष्ट्र सरकारने सोमवारी यासाठी जमिनीला मंजुरी दिली आहे. मुंबईपासून सुमारे 150 किलोमीटर दूर असलेल्या इगतपुरीमध्ये ही नवीन फिल्म सिटी साकारली जाईल.

उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

हा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ही नवीन फिल्म सिटी मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी प्रमाणेच असेल आणि येथे मोठ्या प्रमाणावर शूटिंगच्या सुविधा उपलब्ध असतील. या चित्रनगरीमध्ये चित्रपट आणि टीव्ही शोच्या शूटिंगसाठी इनडोअर स्टुडिओ, आउटडोअर सेट आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध असतील.

(नक्की वाचा-  Apple Watch Saves Life: ॲपल वॉचमुळे मुंबईतील तरुणाचा वाचला जीव! पुडुचेरीमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यानचा थरार)

इगतपुरीसारख्या डोंगराळ भागात फिल्म सिटी उभी राहिल्याने उत्तर महाराष्ट्रात चित्रपट निर्मितीला मोठे प्रोत्साहन मिळेल. सोमवारी झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅबिनेट सदस्य छगन भुजबळ आणि आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे केवळ चित्रपट उद्योगालाच नव्हे, तर स्थानिक रोजगाराच्या संधींनाही फायदा होण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, नाशिक ही भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी आहे. त्यामुळे नाशिक येथे चित्रपटसृष्टी उभारणे ही फक्त सांस्कृतिक दृष्टीनेच नव्हे, तर आर्थिक, पर्यटन आणि प्रादेशिक विकासाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

Advertisement

महामार्ग, रेल्वे, विमान वाहतूक आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने झालेल्या पायाभूत सुविधा या सर्व घटकांमुळे चित्रनगरीच्या निर्मितीसाठी नाशिक सर्वार्थाने अनुकूल आहे. या प्रकल्पाची तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्यता तपासण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारे तातडीने अद्ययावत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Topics mentioned in this article