राहुल कुलकर्णी, पुणे
राज्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (GSB) आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात 62 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सहा झाली आहे. राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्याही 173 वर पोहोचली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील काशीबाई नवले रुग्णालयात 63 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसने बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. मृत व्यक्ती कर्वेनगरमधील रहिवासी होती. 28 जानेवारीला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ताप, जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास होता. त्यांना आयव्हीआयजी इंजेक्शन देण्यात येत होते.
(नक्की वाचा- - CIDCO Lottery 2025: सिडको माझे पसंतीचे घर सर्वांनाच मिळणार? 26 हजार घरांसाठी किती अर्ज?)
बुधवारी अस्वस्थ वाटू लागले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जीबीएसमुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू सोलापूरमध्ये झाला. हा रुग्ण पुण्यातून सोलापूरला गेला होता. त्यानंतर पुण्यात ४ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
(नक्की वाचा- Karuna Munde: 2 लाख गुजारा भत्ता मिळालेल्या करुणा मुंडेंची संपत्ती किती? आकडा पाहून डोळे फिरतील)
'जीबीएस' ची कारणे आणि उपाय
'जीबीएस' होण्याचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही, परंतु दूषित पाण्यातील जीवाणूंमुळे याचा प्रसार होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून थंड करून प्यावे आणि स्वच्छता बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.