
करुणा मुंडे या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता कोर्टाने दिलेल्या एका निर्णयामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. या निर्णयात कोर्टाने त्यांना गुजारा भत्ता म्हणून दोन लाख रुपये दिले जावेत असे आदेश धनंजय मुंडे यांना दिले आहेत. त्यातले 1 लाख 25 हजार हे करुणा मुंडे यांना तर 75 हजार मुलीसाठी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करुणा मुंडे आणि त्यांची मुलगी शिवानी यांची सध्याची आर्थिक परिस्थिती, तसेच अन्य निकषांच्या आधारे त्यांना अंतरिम देखभालीसाठी हे दोन लाख दर महिना देण्याचे आदेश आहेत. त्यामुळे करुणा मुंडे यांची आर्थिक स्थिती काय आहे? त्यांची एकूण संपत्ती किती आहे याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार करुणा मुंडे यांच्या संपत्तीवर लक्ष टाकले असता तुमचेही डोळे फिरतील.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
करुणा मुंडे यांनी नुकतीच परळीतून विधानसभा निवडणूक लढण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी प्रतिज्ञापत्रही दाखल केले होते. त्यात त्यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेख केला होता. त्या आधी त्यांनी कोल्हापुरातूनही पोटनिवडणूक लढली होती. त्यावेळी ही त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. त्यावेळी पहिल्यांदा त्यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला होता. त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रा नुसार त्यांच्याकडे 5 लाखाची रोकड आहे. राष्ट्रीय बचत योजना, विमा पत्रे या मध्ये ही त्यांनी गुंतवणूक केली आहे. जवळपास 17 लाखांची त्यांनी गुंतवणूक केलेली आहे.
ट्रेंडिंग बातमी - धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मांना का सोडलं? मुलानं केला खळबळजनक खुलासा
जडजवाहीर, सोनेचांदी,मौल्यवान वस्तूचा ही त्यांनी यात उल्लेख केला आहे. त्यात त्यांच्याकडे 900 ग्रॅम सोने आणि 5 किलो चांदी आहे. बीडमध्ये त्यांच्याकडे 10 लाख किंमतीचे घर आहे. तर मुंबईतल्या घराची किंमत ही जवळपास 4 कोटी पेक्षा जास्त आहे. त्यांच्या नावावर मध्य प्रदेशातल्या इंदूर इथेही जागा आहे. त्याची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत ही 2 कोटी होती. करुणा मुंडे यांच्याकडे स्वत:ची गाडी देखील आहे. त्यामुळे दोन लाख देखभाल भत्ता मिळालेल्या करुणा मुंडे यांच्या नावावर सध्या कोट्यवधींची संपत्ती आहे.
मुंबई न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी करुणा शर्मा यांनी केलेल्या अर्जावर 4 फेब्रुवारी रोजी सुनावणी केली. अर्जदार करुणा मुंडे शर्मा व त्यांची मुलगी शिवानी यांच्या सध्याची आर्थिक परिस्थिती व अन्य निकषांच्या आधारे त्यांना अंतरिम देखभालीसाठी मिळून 2 लाख रुपये देण्याचा अंतरिम निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर करुणा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय 15 लाख रुपये दर महिन्याला मिळाले पाहीजेत अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे त्या या निर्णयाला आव्हान देणार का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world