Guruji Dakshina Increase: महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच, आता या महागाईचा फटका थेट देवाशी संबंधित कार्यांनाही पोहोचला आहे. इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे घराघरांत जाऊन पूजाअर्चा करणाऱ्या पुरोहितांनी (गुरुजी) आपल्या दक्षिणेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ तब्बल 30 टक्के असणार असून आगामी श्रावण महिना आणि गणेशोत्सवापासून या नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे.
भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभकार्याला किंवा सण-उत्सवाला घरात पूजाअर्चा करण्याची परंपरा आहे. यासाठी गुरुजींना आमंत्रित केले जाते. यातील बहुतांश पुरोहितांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच गोष्टींवर चालतो. पण आता इंधनाच्या वाढलेल्या दरांमुळे गुरुजींचा प्रवास खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे.
(नक्की वाचा: Ashadhi Ekadashi 2026 Date: आषाढी एकादशी कधी आहे 24 की 25 जुलै? जाणून घ्या योग्य तिथी आणि पूजेचा शुभ मुहूर्त)
पूजेचे साहित्यही झाले महाग
केवळ प्रवास खर्चच नाही तर पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यालाही महागाईची मोठी झळ बसली आहे. एकेकाळी 10 रुपयांना मिळणारा उदबत्तीचा पुडा आता 50 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. याशिवाय पूजेत महत्त्वाचे असणारे तूप, तेल, कापूर, धूप, समिधा, ताजी फुले आणि सुका मेवा यांचे दरही गगनाला भिडले आहेत. परिणामी वाढलेल्या खर्चामुळे जुन्याच दक्षिणेत घर चालवणे कठीण झाल्याचे पुरोहितांचे म्हणणे आहे.
(नक्की वाचा: Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीला करा फक्त 'हे' एक काम, मिळेल वर्षभराच्या 24 एकादशींचे पुण्य!)
एकीकडे महागाईमुळे दक्षिणेत वाढ करण्याची चर्चा असली तरी पुरोहित वर्गातच एक दुसरा मतप्रवाह देखील पाहायला मिळत आहे. थोडक्यात सांगायचे तर आगामी सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना घरगुती बजेट थोडे वाढवावे लागणार आहे. पूजेच्या साहित्यापासून ते गुरुजींच्या दक्षिणेपर्यंत सर्वच ठिकाणी वाढती महागाई पाहायला मिळणार हे नक्की.