Mumbai Local Train: मुंबईत सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग; रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम

Mumbai Rains Update : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत मुंबई आणि शेजारील पालघर, ठाणे जिल्ह्यांमध्ये 'जोरदार पाऊस' पडण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Rains : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाची तिसऱ्या दिवशीही जोरदार बॅटिंग सुरू आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने सोमवारी सकाळपासूनच कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहराच्या अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्थेवर काहीसा परिणाम झाला आहे.

शहराची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल सेवा पावसामुळे मंदावली आहे. लोकल ट्रेन सुमारे 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. ज्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.

(नक्की वाचा-  Maharashtra weather Update : पुण्यात रेड अलर्ट, मुंबई आणि दक्षिण विदर्भात 21 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा)

लोकलप्रमाणेच रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने वाहनांची गती कमी झाली आहे. याचा थेट परिणाम शहरातील वाहतुकीवर झाला आहे. दादर रेल्वे स्थानकात पावसामुळे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर अंधेरी सबवे देखील पाणी साचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दादरच्या हिंदमाता, सायनच्या गांधी मार्केट परिसरातही पाणी साचलं आहे. 

(नक्की वाचा-  Free AI Courses : जगात बोलबाला असलेल्या क्षेत्रात करिअरची संधी; सरकारकडून 5 मोफत AI कोर्सेस)

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत मुंबई आणि शेजारील पालघर, ठाणे जिल्ह्यांमध्ये 'जोरदार पाऊस' पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कामासाठी बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisement

Topics mentioned in this article