
Free AI Courses On Swayam: जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने विद्यार्थ्यांसाठी Swayam Portal वर पाच मोफत AI कोर्सेस उपलब्ध केले आहेत. या कोर्सेसमुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये मिळवता येतील. हे कोर्सेस विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना AI चा उपयोग कसा करायचा, हे शिकवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.
Swayam Portal वर उपलब्ध असलेले 5 मोफत AI कोर्सेस
एआय मशीन लर्निंग पायथॉन (AI/ML Python)
हा कोर्स आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंगची मूलभूत माहिती देतो. यात स्टॅटिस्टिक्स, लिनियर अल्जेब्रा, ऑप्टिमायझेशन आणि डेटा व्हिज्युअलायझेशन यांसारख्या संकल्पनांवर लक्ष केंद्रित केले आहे. यात डेटा सायन्समध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 'पायथॉन' प्रोग्रामिंग भाषेचाही समावेश आहे. हा कोर्स 36 तासांचा असून, शेवटी एक सर्टिफिकेशन असेसमेंट घेतली जाते.
(नक्की वाचा- Citizenship Documents: आधार, पॅन आणि मतदार ओळखपत्रही नाही... तरीही नागरिकत्व कसे सिद्ध करणार? वाचा सर्व माहिती)
क्रिकेट ॲनालिटिक्स विथ AI (Cricket Analytics With AI)
आयआयटी मद्रासच्या प्राध्यापकांनी डिझाइन केलेल्या या कोर्समध्ये क्रिकेटच्या उदाहरणातून स्पोर्ट्स ॲनालिटिक्सची मूलभूत माहिती शिकवली जाते. 25 तासांच्या या कोर्समध्ये पायथॉनचा वापर करून आकडेवारी कशी समजून घ्यायची, हे सांगितले जाते. कोर्सच्या शेवटी एक बहुपर्यायी मूल्यांकन घेतले जाते.
एआय इन फिजिक्स (AI in Physics)
हा कोर्स मशीन लर्निंग आणि न्यूरल नेटवर्क्सचा वापर करून भौतिकशास्त्रातील समस्या कशा सोडवायच्या, हे शिकवतो. यात इंटरॲक्टिव्ह सेशन्स, प्रात्यक्षिक उदाहरणे आणि हँड्स-ऑन लॅब वर्कचा समावेश आहे. हा कोर्स एकूण 45 तासांचा आहे.
( नक्की वाचा : Voter ID डाऊनलोड कसा करणार? वाचा सोपी पद्धत, काही मिनिटांमध्येच होईल काम )
एआय इन अकाउंटिंग (AI in Accounting)
वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या कोर्समध्ये अकाउंटिंगमध्ये AI चा उपयोग कसा करायचा, हे समजावून सांगितले जाते. 45 तासांच्या या कोर्सच्या शेवटी सर्टिफिकेशन असेसमेंट घेण्यात येते.
एआय इन केमिस्ट्री (AI in Chemistry)
आयआयटी मद्रासच्या या कोर्समध्ये केमिस्ट्रीतील डेटासेटचा वापर करून AI आणि पायथॉनचा वापर कसा करायचा, हे दाखवले आहे. यातून रासायनिक अभिक्रियांचे मॉडेलिंग करणे आणि औषधे डिझाइन करणे यांसारख्या गोष्टी शिकता येतात. या कोर्सचा कालावधी 45 तास आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world