Maharashtra Rain Forecast : मुंबईत आज काही ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर राज्यात 10 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर दोन जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रेड, ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे
राज्यात आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरीत आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अत्यंत मुसळधार पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता आहे.
तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, नाशिक घाट, पुणे, पुणे घाट, सातारा घाट, अहिल्यानगर, कोल्हापूर घाट, सातारा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज ठिकाणी मसुळधार ते अतिमसुळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
(नक्की वाचा- Badlapur News: बदलापूरकरांना मोठा दिलासा! पुढील 30 वर्षांचा पाणीप्रश्न मिटणार)
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
तर धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
(नक्की वाचा- Pune News : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; अजित पवारांचा लग्नातील फोटो व्हायरल)
महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.