सूरज कसबे, प्रतिनिधी
Pune Traffic Alert Today : पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रमुख वाहतुकीचे मार्ग असलेल्या पुणे-नाशिक महामार्ग आणि तळेगाव-चाकण रस्त्यावर आज भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली.दोन्ही मार्गांवर तब्बल 6 ते 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून,गेल्या दोन तासांहून अधिक काळ वाहनचालक या कोंडीत अडकून पडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,वीकेंड आणि औद्योगिक क्षेत्रातील वर्दळीमुळे या दोन्ही मार्गांवर आज अचानक अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली.क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहने एकाच वेळी रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आणि पाहता पाहता दोन्ही बाजूंनी वाहनांची कोंडी झाली.यामध्ये नोकरदार,प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.अनेक वाहने गेल्या दोन तासांपासून एकाच जागेवर उभी असल्यामुळे प्रवासी प्रचंड हैराण झाले आहेत.
नक्की वाचा >> Shirdi News: साईबाबांना 1 कोटींचा सुवर्ण मुकूट अर्पण, 'या' साईभक्ताची शिर्डीसह देशभरात रंगलीय चर्चा
वाहतूक कोंडी पूर्णपणे फुटण्यासाठी आणखी काही वेळ लागणार?
दरम्यान,घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.रस्त्यावरील वाहनांचा अडथळा दूर करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.अवजड वाहनांना बाजूला करून लहान वाहनांसाठी मार्ग मोकळा केला जात आहे.मात्र,वाहनांची संख्या अथांग असल्याने कोंडी पूर्णपणे फुटण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.प्रवाशांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world