Mumbai News : वृद्धाश्रमात राहून मदतीचा हात; 82 वर्षीय व्यक्तीने केली 20 लाखांची मदत

Mumbai News : गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये त्यांच्या पत्नी सुमती करंदीकर यांचं कर्करोगाने निधन झालं. कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांची धावपळ आणि पैशाअभावी धडपड त्यांनी जवळून पाहिली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News : वृद्धाश्रमातील 82 वर्षीय व्यक्तीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीला 20 लाखांची देणगी दिली आहे. 82 वर्षीय सदानंद विष्णू करंदीकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 10 लाखांची आणि पंतप्रधान सहाय्यता निधीला 10 लाख रुपये अशी 20 लाखांची देणगी दिली आहे. 

सदानंद करंदीकर हे खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. अपत्य नसल्याने शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सदानंद करंदीकर पत्नी सुमती करंदीकर यांच्यासह नेरुळमधील आनंद वृद्धाश्रमात रहायला गेले.

(नक्की वाचा-  Rain Alert : कोकणात आज मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्यात कशी असेल स्थिती?)

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये त्यांच्या पत्नी सुमती करंदीकर यांचं कर्करोगाने निधन झालं. कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांची धावपळ आणि पैशाअभावी धडपड त्यांनी जवळून पाहिली. त्यामुळे पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी देणगी देण्याचा निर्णय घेतला.

अध्यात्म, देवभक्ती आणि शेतीत रस असलेल्या सदानंद करंदीकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला 10 लाख आणि पंतप्रधान सहायता निधीला 10 लाख असा 20 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

Advertisement

(नक्की वाचा-  Pune News: 'हे बाळ माझं नाही तर दुसऱ्याचे', वैष्णवी बरोबर त्या घरात भयंकर घडलं, FIR मध्ये धक्कादायक बाबी)

आज सकाळी डोंबिवलीतून त्यांनी लोकल पकडली आणि बसचा प्रवास करुन ते मंत्रालयात आले. ते मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा गावचे आहेत. सध्या ते त्यांची बहीण प्रभा श्रीराम शितूत यांच्याकडे राहतात.

Topics mentioned in this article