
Rain Alert : राज्यात वळीवाच्या पावसाने जोर धरला असून अनेक भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस कोकणात, तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.
22May, latest satellite obs at 7.30 am indicate a mod intensity cloud patch over South Konkan. Rest of Maharashtra scattered type clouds.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 22, 2025
As a effect of the system in Arabian Sea, a dense cloud mass observed over AS.
As posted earlier,only light rains obsd in city.
Pl watch IMD pic.twitter.com/WRFVrIaSzH
( नक्की वाचा : Amrit Stations : राज्याला मिळणार 15 अमृत स्टेशन, PM मोदी करणार उद्घाटन )
कोकणाला ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे याठिकाणी काही भागात आज वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Pune News : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; अजित पवारांचा लग्नातील फोटो व्हायरल)
कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट?
मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world