Dadar Kabutarkhana : उच्च न्यायालयाचा अवमान, बंदी असतानाही दाणे देण्यासाठी कबुतरप्रेमीने लढवली अजब शक्कल

सरकारने म्हटलं आहे की, कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे विकार होतात. दादर हा गर्दीचा परिसर आहे, त्यामुळे येथे लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ddadar kabutarkhana : मुंबईत गेल्या आठवड्यात राज्य सरकारच्या आदेशानंतर पालिकेने कबुतरांना दाणे टाकण्यावर निर्बंध आणले आहेत. याशिवाय कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून झाकण्यात आलं आहे. ज्यानंतर एका व्यक्तीने दादारमधील आपल्या कारच्या छतावरुन कबुतरांना खाण्यासाठी दाणे टाकले आहेत. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यावरुन स्थानिकांनी विरोध केला आहे. कारच्या छतावरुन कबुतरांना दाणे देत असल्याने स्थानिक आणि त्या व्यक्तीमध्ये वादावादी झाल्याचं सांगितलं जात आहे. 

स्थानिकांकडून संताप...

दादरमधील स्थानिकांनी दाणे देणाऱ्या व्यक्तीला खूप ऐकवलं. आपल्या भागात जाऊन दाणे टाक, येथे का आला, असा सवाल स्थानिकांनी कबुतर प्रेमीला विचारला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबईत कबुतरांना दाणे टाकणं आणि कबुतरखाने बंद करण्यात आले आहे. दरम्यान पालिकेकडून यासंदर्भात काम केलं जातं आहे. 

नक्की वाचा - श्वास घ्यायला त्रास, 10 वर्षांपासून आजारपण, कबुतराच्या एक पिसामुळे मुंबईच्या वनिता सांगडेंचं आयुष्य उद्ध्वस्त

कबुतरांवर का आणलीये बंदी?

सद्यस्थितीत मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना यासंदर्भात कडक चौकशीचे आदेश दिले आहेत. जर एखादी व्यक्तीने परवानगी नसतानाही कबुतरांसाठी दाणे टाकत असेल त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावी. या आदेशानंतर पोलिसांनी एकट्या दादरमधून १०० हून अधिक जणांना दंड ठोठावला आहे. 

Advertisement

दादर कबुतरखाना राडा...

दादरमधील कबुतरखाना हटवण्यावरुन 6 ऑगस्ट रोजी मोठा राडा झाल्याचे समोर आले होते. जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली होती. जैन बांधवांनी अचानक दादरमधील कबुतरखान्याच्या ठिकाणी गर्दी केली. यावेळी संतप्त जमावाने कबुतरखान्यावर झाकलेली ताडपत्री हटवली. जैन समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.