High tide in Mumbai : पुढील तीन ते चार दिवस मुंबईसह, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 26 जुलै रोजी तर अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान 24 ते 27 जुलै 2025 या कालावधीत सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरतीची शक्यता आहे. त्यामुळे या दिवसात समुद्रकिनारी जाणे टाळावे आणि यासंदर्भात प्रशासनाकडून जारी इतर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे. (Mumbai Rain Update)
गुरुवार 24 जुलै 2025 ते रविवार, 27 जुलै 2025 या कालावधीदरम्यान सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. तर, 26 जुलै 2025 रोजी समुद्रात सर्वात मोठी म्हणजे 4.67 मीटर इतक्या उंचीची लाट उसळणार आहेत. भरती काळादरम्यान नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, तसेच, या अनुषंगाने प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेडून नागरिकांना करण्यात येत आहे.
नक्की वाचा - Maharashtra Weather Update : 26 जुलैला Red Alert! महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा?
जुलै 2025 महिन्यातील भरतीसंदर्भात माहिती
गुरुवार, 24 जुलै सकाळी – 11.57 वा. लाटांची उंची (मीटर) - 4.57
शुक्रवार, 25 जुलै दुपारी – 12.40 वा. लाटांची उंची (मीटर) - 4.66
शनिवार, 26 जुलै दुपारी – 01.20 वा. लाटांची उंची (मीटर) - 4.67
रविवार, 27 जुलै दुपारी – 01.56 वा. लाटांची उंची (मीटर) - 4.60