
Maharashtra Rain Update : पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून 24 ते 28 जुलैपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना अधिक काळजी घ्यावी, त्यातही फिरायला जाण्याचा प्लान करीत असाल तर काही जिल्ह्यांमध्ये पर्यटनासाठी जाणं धोक्याचं ठरू शकतं. (26 July red alert)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 24 जुलै रोजी सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ज देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तर 25 जुलै रोजी सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागात प्रवास करीत असाल तर अधिक काळजी घेण्याची गरज आहे. उद्या मुंबई, उपनगर, ठाणे, नाशिक, पालघर या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उद्या मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

26 जुलै - हवामान विभागाचा अंदाज
26 जुलै रोजी सातारा, रत्नागिरी, रायगड, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दिवशी विदर्भात गडचिरोली, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 27 जुलै रोजीही विदर्भात ऑरेंज अलर्ट तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
26 जुलैला कसा असेल पाऊस?
दरम्यान 26 जुलै 2005 रोजी म्हणजे साधारण 20 वर्षांपूर्वी मुंबईत महापूर आला आहे. या दिवशी तब्बल 944 मिमी इतका पाऊस पडला होता. या पावसाच्या कडू आठवणी अद्यापही ताज्या आहेत. यंदा मात्र अद्याप तरी हवामान विभागाकडून मुंबई, उपनगरात पावसाचे संकेत दिलेले नाहीत. दरम्यान 26 जुलै 2005 रोजी म्हणजे साधारण 20 वर्षांपूर्वी मुंबईत महापूर आला आहे. या दिवशी तब्बल 944 मिमी इतका पाऊस पडला होता. या पावसाच्या कडू आठवणी अद्यापही ताज्या आहेत. यंदा मात्र अद्याप तरी हवामान विभागाकडून मुंबई, उपनगरात पावसाचे संकेत दिलेले नाहीत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world