पालघरमध्ये हिट अँड रन; भरधाव कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप

Palghar Hit and Run : दुचाकीने घरी येणाऱ्या एका तरुणाला भरधाव स्कार्पिओ कारने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. सागर गजानन पाटील (वय वर्षे 29) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, पालघर

पालघरमधून हिट अँड रनची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातल्या मनोर पोलीस स्टेशन हद्दीत रात्री एक वाजताच्या सुमारास कामावरून दुचाकीने घरी येणाऱ्या एका तरुणाला भरधाव स्कार्पिओ कारने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. सागर गजानन पाटील (वय वर्षे 29) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसारत सागर हा दुर्वेश येथून ड्युटी संपवून त्याच्या मोटरसायकलने मनोर येथे घरी येत होता. त्याचवेळी मनोरच्या हात नदीच्या गणेश घाटाजवळ  मनोरहून महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या भरधाव स्कार्पिओ कारने त्याला समोरून धडक दिली. यावेळी कारमध्ये दोन जण होते, मात्र त्यांनी जखमी सागरला उपचारासाठी कुठेही न नेता घटनास्थळावरून पलायन केले. 

सागरला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप करत कारचालक आणि मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. या प्रकरणी मनोर पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा  आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. 

दरम्यान या प्रकरणी मनोर पोलिसांनी एक आरोपीला ताब्यात घेतले आहे. सचिन गोरख सुरवसे  (32 वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. मात्र, मुख्य आरोपी सोडून दुसऱ्यालाच आरोपी बनवले असल्याचा आरोप नातेवाईकांनी आरोप केला आहे.

Advertisement

स्कार्पिओ कार मालक शिवाजी गुंजिटे या दगड खाण व्यावसायिक आहे. अपघाताच्या वेळी कार मालक शिवाजी गुंजिटे हा देखील गाडीत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र पोलीस त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. दोघांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. 

Topics mentioned in this article