रेवती हिंगवे, पुणे
Pune News : नवऱ्याने बायकोची गळा आवळून हत्या केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. बायकोचा खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी नवऱ्याने चक्क दुचाकीवरून प्रवास केला. रात्री दीड वाजेच्या सुमारास मृतदेह दुचाकीवरून घेऊन जाताना आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राकेश रामनायक निसार असे आरोपी पतीचे नाव आहे. तर बबिता राकेश निशार असं मृत पत्नीचं नाव आहे. नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा घडला प्रकार घडला आहे. भूमकर पुलाजवळून राकेश बायकोचा मृतदेह घेऊन स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला रंगेहात पडलं.
(नक्की वाचा- Ajit pawar vs Shivsena: "दादा'गिरीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता! शिंदे सेनेत उद्रेक होणार?)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रागाच्या भरात राहत्या घरात नवऱ्याने बायकोचा खून केला. नऊ वर्षांच्या मुलासमोरच पत्नीची हत्या केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. हत्येचं कारण अद्याप समोर आलं नाही.
(नक्की वाचा- Railway News : मुंबईत मेट्रोनंतर जमिनीखालून धावणार रेल्वे? परेल-CSMT मार्गावर विचार सुरु)
हत्येनंतर आरोपी मृतदेह गोणीत भरून विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जात होता. गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली. त्यावेळी दुचाकी लावून आरोपी पळून जात होता. पोलिसांकडून पाठलाग करून त्याला अटक केली आहे. पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.