IAS पूजा खेडकर यांचा 'कार'नामा; ओव्हर स्पीड, सिग्नल मोडल्याप्रकरणी ऑडी कारचे 21 चलान प्रलंबित

पूजा खेडकर यांना पुणे वाहतूक पोलिसांना नोटीस बजावली आहे. कारवर अनधिकृतरित्या अंबर दिवा लावणे, महाराष्ट्र शासन लिहिणे याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
ट्रेनी आईएएस पूजा खेडकर की कार के नाम पर हैं कई चालान

ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाही. पुणे महापालिकेत नियुक्ती असताना बंगला, गाडी आणि अलिशान कार्यालयाची मागणी पूजा खेडकर यांनी केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. मात्र आता ऑडी कारमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात असताना त्या ऑडी कारचा वापर करत असत. या कारच्या नावे अनेक चलान प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. 

पूजा खेडकर यांना पुणे वाहतूक पोलिसांची नोटीस

पूजा खेडकर यांना पुणे वाहतूक पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कारवर अनधिकृतरित्या अंबर दिवा लावणे, महाराष्ट्र शासन लिहिणे याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पूजा वापरत असलेली ऑडी कार खासगी कंपनीच्या नावावर असल्याची माहिती समोर येत आहे.

या कारवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याच्या 21 तक्रारी आहेत. तसेच 27 हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. मात्र पुणे पोलिसांना अद्याप कोणतीही कारवाई का केली नाही, असा सवाल देखील उपस्थित होत आहे. 

(नक्की वाचा- VIDEO : हातात बंदूक, सोबत बाऊन्सर...जमिनीसाठी शेतकऱ्यांना धमकी; पूजा खेडकरांच्या आईचा प्रताप)

पूजा खेडकर ऑडी कारवर अंबर दिवा लावला होत्या. तसेत त्यावर महाराष्ट्र शासन असं देखील लिहिलं होतं. पुणे पोलीस देखील या ऑडी कारबाबत चौकशी करत आहेत. ओव्हर स्पीडिंग, सिग्नल मोडणे, पोलिसांनी थांबवल्यास न थांबणे यासाठी अनेक चलान वाहतूक पोलिसांनी पाठवले आहेत. 

Advertisement

पूजा खेडकर वापरत असलेल्या कारवरील चलानबाबत त्यांना माहिती होती का? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे पोलीस आता सविस्तर चौकशी करत आहेत की पूजा यांच्या ताब्यात असताना कारवर किती चलान आहेत. पुणे वाहतूक पोलिसांचा कारवाई महत्त्वाची आहे, कारण पुण्यात असताना पूजा स्वत: कार चालवत असत अशी माहिती समोर येत आहे. 

(नक्की वाचा - वडिलांची संपत्ती 40 कोटी, लेकीला नॉन क्रिमिलेयरमधून IAS पद; पूजा खेडकरांना कोणाचा राजकीय वरदहस्त?)

खेडकर यांची वाशिम येथे बदली

पूजा खेडकर यांची सध्या वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. लवकरच त्यांना सरकारी क्वॉर्टर दिला जाणार आहे. सध्या त्या गेस्टहाऊसमध्ये राहत आहेत. वाशिममध्ये त्यांना अद्याप कोणतंही कार्यालय किंवा कार दिलेली नाही. पूजा खेडकर यांना पुढील आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसिंचन विभागात काम करण्याची संधी मिळू शकते. नोव्हेंबरनंतर त्यांना स्वतंत्र चार्ज दिला जाईल. 

Advertisement