जाहिरात

वडिलांची संपत्ती 40 कोटी, लेकीला नॉन क्रिमिलेयरमधून IAS पद; पूजा खेडकरांना कोणाचा राजकीय वरदहस्त?

निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पूजाच्या वडिलांनी त्यांची संपत्ती तब्बल 40 कोटींची असल्याचे आणि शेतीतून 43 लाख वार्षिक उत्पन्न असल्याचे जाहीर केले आहे. 

वडिलांची संपत्ती 40 कोटी, लेकीला नॉन क्रिमिलेयरमधून IAS पद; पूजा खेडकरांना कोणाचा राजकीय वरदहस्त?
पुणे:

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएएस पदावर रुजू होणाऱ्या पूजा दिलीप खेडकर (IAS Puja Dilip Khedkar) यांनी UPSCच्या 2022 च्या परीक्षेत देशात 821 ऑल इंडिया रँक मिळवला. या रँकवर आयएएस पद मिळणे अवघड असतानाही पुजाने ते प्राप्त करण्यासाठी ओबीसी नॉन क्रीमिलेअर असल्याचे प्रमाणपत्र देऊन दृष्टिदोष आणि मानसिक आजार असल्याचे सांगतील होते. त्यावर आयएएस पदावर वर्णी लावली आहे. पण वंचित बहुजन पक्षाकडून तिच्या माजी आयएएस अधिकारी राहिलेल्या वडिलांनी नुकतीच लोकसभा निवडणूक दक्षिण अहमदनगरमधून लढवली आहे. त्यात निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती तब्बल 40 कोटींची असल्याचे आणि शेतीतून 43 लाख वार्षिक उत्पन्न असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पूजा (IAS Puja Khedkar) यांनी सादर केलेल्या नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहेत.

वर्षाला 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांनाच संबंधित प्रमाणपत्र देण्यात येते. त्यामुळे पूजा खेडकरच्या वडिलांची 40 कोटींचं उत्पन्न असताना तिला नॉन क्रिमिलेयरअंतर्गत प्रमाणपत्र कसं मिळालं? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुसऱ्या बाजूला कागदोपत्री मिळालेल्या माहितीनुसार, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून असिस्टंट डायरेक्टर इन स्पोर्ट्स ऑथॉरिटी इंडिया या पदावर पूजा खेडकर यांची सन 2021 मध्ये निवड झाली होती. या वेळी त्यांनी ओबीसी व पीडब्ल्यूबीडी 1 (एलव्ही) हे दिव्यांगत्व असल्याचं सांगितलें होतं.

नक्की वाचा - BMW Hit and Run : एका दिवसात 40 कॉल, गर्लफ्रेंड सांगणार मिहीरचं सर्व सत्य

मात्र, पुढील वर्षीच पार पडलेल्या यूपीएससी परीक्षेच्या अंतिम निकालात तिची निवड होताना त्यांनी पीडब्ल्यूडी 5 (मेंटल डिसअॅबिलिटी) हे दिव्यांगत्व दाखवले आहे. कॅटने त्यांना सहा वेळा दृष्टिदोष व मानसिक आजाराच्या तपासणीसाठी बोलावून देखील त्या वैद्यकीय तपासणीसाठी हजर राहिलेल्या नव्हत्या. त्यामुळे कॅटने तिच्याविरोधात निकाल दिला होता. मात्र, त्यानंतरही त्यांनी याबाबत दुसऱ्याच वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र देऊन आयएएस पद मिळवले.

एखाद्या उमेदवारास संबंधित रँकनुसार होम केडरचे वाटप केले जात नसतानाही त्यांना महाराष्ट्र होम कॅडर मिळून थेट होम डिस्ट्रिक्टमध्ये कशा प्रकारे प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक दिली गेली, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून त्याबाबतचे स्पष्टीकरण संबंधित यंत्रणांनी देणे आवश्यक झाले आहे. मसुरी येथे प्राथमिक प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना सुरुवातीला महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी नियुक्ती मिळाली होती. परंतु त्यात नंतर बदल करून त्यांना पुणे जिल्ह्यात बदली दिली गेल्याचे सांगितले जात असल्याने यामागे नेमका कुणाचा राजकीय वरदहस्त आहे हेदेखील व्हायला पाहिजे.

Switch To Dark/Light Mode
Previous Article
13 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप, बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापे
वडिलांची संपत्ती 40 कोटी, लेकीला नॉन क्रिमिलेयरमधून IAS पद; पूजा खेडकरांना कोणाचा राजकीय वरदहस्त?
alandi 23 year old boy success story vegetable seller to photographer
Next Article
आळंदीच्या बाबूरावची 'स्टाईल' तरुणांसाठी प्रेरणादायी, अवघ्या 6 वर्षात  शून्यातून निर्माण केलं विश्व
;