जाहिरात

IMD Alert: 'या' कालावधीत यलो अलर्ट,विजा कडाडताना मोबाईल वापरल्यास मृत्यू होतो का? हवामान विभागाची मोठी अपडेट

प्रादेशिक हवामान विभाग मुंबई विभागाची मोठी अपडेट समोर आली आहे. 7 व 8 मे 2026 या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आहे.

IMD Alert: 'या' कालावधीत यलो अलर्ट,विजा कडाडताना मोबाईल वापरल्यास मृत्यू होतो का? हवामान विभागाची मोठी अपडेट
IMD Mumbai Alert For Rain And Lighting

IMD Mumbai Latest Update :  प्रादेशिक हवामान विभाग मुंबई विभागाची मोठी अपडेट समोर आली आहे. 7 व 8 मे 2026 या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची आणि 40 ते 50 किमी प्रतीतास वेगाने सोसाट्याचा वारे वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

या कालावधीत विजा चमकत असताना ही काळजी घ्यावी

विजा चमकत असताना संगणक,टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून वेगळी करून ठेवावीत.दूरध्वनी,भ्रमणध्वनीचा वापर टाळावा.विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

नक्की वाचा >> 8 महिन्यांची गर्भवती झाली TVK ची आमदार,प्रचार करताना झाली होती बेशुद्ध,वाचा पल्लवीची थक्क करणारी Success Story

  • विजेच्या खांबांपासून लांब रहावे.
  • विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.
  • विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास,गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.
  • धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. 
  • वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईलवर ‘दामिनी APP'डाऊनलोड करून घ्यावे.
  • पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये.
  • मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे. 
  • अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.

नक्की वाचा >> Kalyan News: पाण्याचा थेंबही वाया घालवू नका, कल्याण-डोंबिवलीत पाणी कपातीचं भीषण संकट, तारीख अन् वेळ वाचा

हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in//  या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02362)228847 किंवा टोल फ्री 1077 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com