SC, ST कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करा, प्रकाश आंबेडकरांचं पंतप्रधानांना पत्र

पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करून एससी, एसटी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये जे आरक्षण द्यायला हवे, त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Advertisement
Read Time: 1 min

अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) कर्मचाऱ्यांबाबत पदोन्नतीतील आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी, यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. याबाबत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

(नक्की वाचा-  उद्धव ठाकरेंची विधानसभेसाठीची रणनिती ठरली; संपर्कप्रमुखांना दिले महत्त्वाचे निर्देश)

प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीच्या (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी कलम 16(4 A) आणि अनुच्छेदमधील कलम 16(4) B नुसार केंद्र सरकारमधील पदोन्नतीतील आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मुद्दा पंतप्रधान कार्यालयाकडे पत्राद्वारे उपस्थित केला आहे. 

(नक्की वाचा - पूजा खेडकरांवर UPSC ची सर्वात मोठी कारवाई; गुन्हा दाखल, नोकरीवरही टांगती तलवार)

हे पत्र 18 जुलै रोजी पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) ई-मेल करण्यात आले आहे. केंद्र सरकारमध्ये एससी आणि एसटी कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीतील आरक्षणाची अंमलबजावणी न होणे ही गंभीर आणि चिंतेची बाब असल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करून एससी, एसटी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये जे आरक्षण द्यायला हवे, त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती आंबेडकर यांनी केली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article