जाहिरात

Pune News: बिष्णोई गँगच्या तिघांना उत्तराखंडमधून अटक, 'त्या' मॉलवर अंदाधुंद गोळीबार, 2 कोटींची खंडणी अन्..

पिंपरी चिंचवड शहरातील रावेत-पुनावळे परिसरातील प्रसिद्ध एजे फर्निचर मॉलवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाला मोठे यश आले आहे.

Pune News: बिष्णोई गँगच्या तिघांना उत्तराखंडमधून अटक, 'त्या' मॉलवर अंदाधुंद गोळीबार, 2 कोटींची खंडणी अन्..
Lawrence Bishnoi Gang latest News
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी 

Pimpari Chinchwad Crime News : पिंपरी चिंचवड शहरातील रावेत-पुनावळे परिसरातील प्रसिद्ध एजे फर्निचर मॉलवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाला मोठे यश आले आहे. या खळबळजनक प्रकरणी पोलिसांनी थेट उत्तराखंडमधून आंतरराज्य टोळीच्या तीन सराईत गुंडांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेले आरोपी कुख्यात आरजू बिश्नोई आणि कुलदीप कशिश गॅंगशी संबंधित असल्याचे तपासात उघड झाले आहे.

प्रवीण रामनिवास पंकज,कुलदीप राठी आणि सागर अजय पाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.15 मे रोजी रात्री नऊच्या सुमारास दोन अज्ञात हल्खोरांनी एजे फर्निचर मॉलवर अचानक तब्बल आठ राउंड फायरिंग केली होती. या थरारक गोळीबारामुळे परिसरात कमालीची दहशत निर्माण झाली होती. घटना घडवून आणल्यानंतर आरोपी तातडीने महाराष्ट्राबाहेर फरार झाले होते.

2 कोटींची खंडणी नाकारल्याने गोळीबार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गोळीबारापूर्वी आरोपींनी फर्निचर मॉलच्या मालकाकडे तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.मात्र,मॉल चालकाने ही खंडणी देण्यास साफ नकार दिला.याच रागातून आणि व्यापाऱ्यांमध्ये स्वतःची दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बिश्नोई गँगच्या या गुंडांनी मॉलला लक्ष्य करत बेछूट गोळीबार केला.

नक्की वाचा >> Shirdi News: शिर्डी साईबाबा मंदिर परिसरातील बालकांचे आरोग्य धोक्यात, अनेकांना लागलंय 'त्या' लाल बाटलीचं वेड

असा लागला छडा

घटनेचे गांभीर्य ओळखून गुंडाविरोधी पथकाने तातडीने समांतर तपास सुरू केला.परिसरातील सीसीटीव्ही फुटेज,तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.आरोपी पोलिसांना गुंगारा देत इंदोर,चंदीगड आणि हरिद्वार अशा विविध राज्यांत पळत होते.अखेर पोलिसांनी कौशल्याने त्यांचा पाठलाग करत उत्तराखंडमध्ये त्यांना बेड्या ठोकल्या.

नक्की वाचा >> Ahilyanagar News : खंडाळा परिसरात नागरिकांची धडधड वाढली, 15 दिवसांपासून मानवी वस्तीत सुरु होता भयानक प्रकार

ही धडक कारवाई गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांचे मोठे कौतुक होत असून शहरातील संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरोधात पोलिसांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत.पोलीस आता या प्रकरणामागील मुख्य सुत्रधार आणि संपूर्ण कटाचा सखोल तपास करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com