नागपुरात एकामागून एक घटना अशा समोर येत आहेत की ज्यामुळे या शहरात नेकमं चाललंय तरी काय? असा प्रश्न पडल्या शिवाय राहात नाही. याआधी हिट अँण्ड रन, त्यानंतर एका कारमधला अश्लील व्हिडीओ, आणि आता चक्क दुचाकीवर अश्लील कृत्य करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरूण आणि तरूणी बाईकवरच अश्लील चाळे करत आहे. विशेष म्हणजे हे चाळे करत हे कपल नागपुरात बाईक वरून फिरत होतं. त्याचा व्हिडीओ काही लोकांनी काढला. त्यानंतर तो जोरदार व्हायरल होत आहे. शेवटी पोलिसांनाही त्याची दखल घ्यावी लागली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उपराजधानी नागपूरात आता दुचाकीवर अश्लील चाळे करणारा एक व्हिडिओ समोर आला असल्याने खळबळ उडाली आहे.पाश्चात्य देशांतील ट्रेण्ड प्रमाणे इंस्टाग्रामवर रील बनविण्यासाठी हे उद्योग केले जात असल्याचं समोर आले आहे. नागपूरात काही दिवसांपूर्वी कारमध्ये अश्लील चाळे करणारा व्हिडीओ समोर आला होता. धरमपेठ परिसरात अशाच पद्धतीने पेशाने चार्टर्ड अकाऊटांट असलेल्या तरुणाने आपल्या अभियंता प्रेयसी सोबत कारमध्ये अश्लील चाळे केले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुण तरुणीला कारवाई करून नंतर नोटीस देऊन सोडले होते.
त्याला एक आठवडा जात नाही तर दुचाकीवर तसाच प्रकार करणारा व्हिडीओ समोर आला आहे. यात हर्ष उर्फ बिल्ली राजेश कहर हा कुख्यात गुंड त्याच्या प्रेयसी सोबत दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या दुचाकीच्या पेट्रोल टँकवर प्रेयसीला बसवून तिच्या सोबत अश्लील चाळे केले. तशा स्थितीतच तो आरोपी सदर पोलिसांच्या हद्दीत बराच वेळ दुचाकीवर फिरला हे विशेष.
(नक्की वाचा- उद्धव ठाकरेंची विधानसभेसाठीची रणनिती ठरली; संपर्कप्रमुखांना दिले महत्त्वाचे निर्देश)
काहींनी त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. पोलिसांनी त्याचा मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा शोध घेतला. विशेष म्हणजे बिल्ली हे टोपण नाव असलेला हा कुख्यात गुंड फक्त एक महिना अगोदरच एका प्रकरणातून कारागृहा बाहेर आला होता. सदर पोलिसांनी प्रेयसी आणि बिल्लीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. शिवाय त्याला कडक शब्दांत समज दिली आहे. या प्रकरणात त्याच्या बरोबरच्या 20 वर्षीय तरूणीवर काहीही कारवाई करण्यात आली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world