मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या एका भारतीय नाविकाच्या संशयास्पद मृत्यूने आणि त्यानंतर समोर आलेल्या सत्याने संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रहिवासी असलेले नाविक राकेश चौहान यांचा व्हनेझुएलामध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांचा मृतदेह भारतात आणण्यात आला. मात्र, संशय आल्याने जेव्हा कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर भारतात पुन्हा एकदा पोस्टमॉर्टम केले, तेव्हा डॉक्टरांच्या अहवालाने सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. राकेश चौहान यांच्या शरीरातील एकही अंतर्गत अवयव शाबूत नसून ते सर्व गायब करण्यात आले आहेत.
भारतीय डॉक्टरांच्या मेडिकल रिपोर्टमधील धक्कादायक खुलासे
'फेडरेशन ऑफ सीफेरर्स युनियन्स ऑफ इंडिया' (FSUI) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर याविषयीची अधिकृत आणि अत्यंत गंभीर माहिती शेअर केली आहे. भारतीय डॉक्टरांच्या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, राकेश यांच्या शरीरात मेंदू, हृदय, दोन्ही फुफ्फुसे, लिव्हर, दोन्ही किडनी, स्प्लीन, पॅंक्रियाज, आतडे, थायरॉईड, लॅरिंक्स आणि ट्रॅकिया यांपैकी एकही अवयव आढळलेला नाही.
शरिरावर शेकडो टाके
मृतदेहावर आधीच मोठ्या प्रमाणावर टाके घालण्यात आले होते. यात गळ्यापासून प्यूबिक सिम्फिसिसपर्यंत 22 टाके आणि एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत 21 टाके होते. शरीरात फॉरेन्सिक तपासणीसाठी आवश्यक असलेले अवयवच शिल्लक न ठेवल्यामुळे, भारतीय डॉक्टरांना मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करता आलेले नाही. मृतदेह सुमारे एक महिना डीप फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होते.
(नक्की वाचा- Palghar News: तारापूर एमआयडीसी हादरली! केमिकम कंपनीत रिॲक्टरचा भीषण स्फोट; 2 किमीपर्यंत जाणवले हादरे राकेश चौहान हे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मर्चंट नेव्हीच्या नोकरीसाठी व्हेनेझुएलाला गेले होते. 2023 मध्ये त्यांचे लग्न झाले होते आणि त्यांना अवघ्या 6 महिन्यांचा एक मुलगा आहे. राकेश यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कंपनीच्या ऑफिसमधून आली होती. कंपनीने सुरुवातीला सांगितले की, राकेश जहाजावरून पडल्याने जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या दिवशी त्यांच्या जगण्याची उमेद 5% असल्याचे सांगण्यात आले आणि त्याच संध्याकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी देण्यात आली. व्हेनेझुएला प्रशासनाने मृतदेह तर भारतात पाठवला, मात्र त्यासोबत कोणताही पोस्टमॉर्टम रिपोर्ट किंवा मृत्यूचे कारण स्पष्ट करणारे अधिकृत दस्तऐवज दिले नाहीत. (नक्की वाचा- तुकाराम मुंढेंना हलक्यात घेतलं; नरिमन पॉईंट येथील प्रसिद्ध हॉटेलसह 6 हॉटेल्सला दणका, FDA ची मोठी कारवाई) पीडित राकेश चौहान यांच्या वडिलांनी म्हटलं की, "आम्हाला संपूर्ण प्रक्रियेत अंधारात ठेवण्यात आले. व्हेनेझुएलात आधीच पोस्टमॉर्टम झाल्याचे सांगितले होते, पण इथे डीएमच्या आदेशाने जेव्हा पुन्हा तपासणी झाली, तेव्हा मुलाच्या शरीरातून अवयव गायब असल्याचे समजले. आम्हाला माझ्या मुलाच्या मृत्यूचे खरे कारण जाणून घ्यायचे आहे. सरकारने संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करावी आणि या आंतरराष्ट्रीय प्रकरणाचा तपास करावा." "राकेश हा कुटुंबातील एकमेव कमावता मुलगा होता. ही निव्वळ दुर्घटना नसून कंपनीचा कट आहे. त्याची हत्या करून अवयवांची तस्करी करण्यात आली आहे. सरकारने या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय पातळीवर उच्चस्तरीय चौकशी करून पीडित कुटुंबाला न्याय आणि आर्थिक भरपाई मिळवून द्यावी, असं राकेश यांच्या वडिलांना म्हटलं. व्हेनेझुएला प्रशासनाची कमालीची गुप्तता
अवयव तस्करी आणि हत्येचा कट