ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Oman Ship Attack News : ओमान किनारपट्टीजवळ एक भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ओमानच्या किनारी भागात जहाजावर हल्ला झाल्याची माहिती समोर आलीय. ओमानच्या किनारपट्टीजवळ एका व्यापारी जहाजावर हल्ला झाल्याचं समजते. जहाजावर एकूण 24 भारतीय खलाशी (Seafarers) असल्याचंही सांगितलं जात आहे. हे सर्व खलाशी जहाजावर अडकले होते. जहाजाचे लोकेशन हार्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) परिसरात असल्याची माहिती आहे. @FSUIINDIA नावाच्या एक्स अकाऊंटवर या जहाजाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दरम्यान,ओमानच्या किनाऱ्याजवळ बुडणाऱ्या 'मॅरिव्हेक्स' (Marivex) या जहाजावरून अखेर ओमानमधील 'मेरियाह' (Meariah) बेटावर सर्वांना सुरक्षितपणे आणण्यात आले. यातील 24 भारतीय कर्मचारी सुखरूप आहेत.
ओमान समुद्र किनाऱ्याजवळील जहाजाचा व्हिडीओ
मिळालेल्या माहितीनुसार, ओमान किनारपट्टीजवळ व्यापाऱ्यांच्या जहाजावर झालेल्या हल्ल्याने खुलाशांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय नौदलाला (Indian Navy) मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.