जाहिरात

Pune News : जेजुरी गडावर मोठा राडा! पालखी शेजारी घडला संतापजनक प्रकार, पुजाऱ्यालाही केली मारहाण, Video व्हायरल

पुण्यातील पुरंदरच्या जेजुरी गडावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे.गडावरील पालखी परिसरात काही व्यक्ती चप्पल घालून आल्याचे निदर्शनास आल्यानंतर तेथील एका पुजाऱ्याने संबंधीत व्यक्तींना रोखलं.

Pune News : जेजुरी गडावर मोठा राडा! पालखी शेजारी घडला संतापजनक प्रकार, पुजाऱ्यालाही केली मारहाण, Video व्हायरल
Jejuri Gad Viral Video
पुणे:

देवा राखुंडे, प्रतिनिधी 

Jejuri Fort News Today : पुण्यातील पुरंदरच्या जेजुरी गडावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे.गडावरील पालखी परिसरात काही व्यक्ती चप्पल घालून आल्याचे निदर्शनास आल्यानंतर तेथील एका पुजाऱ्याने संबंधीत व्यक्तींना रोखलं. "पालखी शेजारी चप्पल घालून का आलात?"असं पुजाऱ्याने त्यांना विचारलं.त्यानंतर दोन्ही गटात एकच वाद पेटला. तीन ते चार जणांनी संबंधित पुजाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केली.या घटनेमुळे गड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्याचे आवाहन

धार्मिक स्थळांवर परंपरा,नियम आणि श्रद्धेचे पालन करणे ही प्रत्येक भाविकाची जबाबदारी आहे. मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी सूचना करणाऱ्या पुजाऱ्यावरच हल्ला झाल्याच्या आरोपामुळे अनेक भाविक आणि स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.अशा पवित्र ठिकाणी वाद घालणे किंवा कायदा हातात घेणे योग्य नसल्याची भावना देखील व्यक्त होत आहे.

नक्की वाचा >> Nagpur News: 14 खेळाडूंना मिळाला ‘खासदार क्रीडा भूषण पुरस्कार', रक्षा खडसे म्हणाल्या, " महाराष्ट्र आघाडीवर.."

पुजाऱ्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात केलं दाखल

मारहाणीत जखमी झालेल्या पुजाऱ्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान,घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिस तपासानंतर संपूर्ण सत्य परिस्थिती समोर येणार आहे.

नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील 'या' रेल्वे मार्गावर 21 दिवसांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काही गाड्यांचे मार्ग बदलले

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com