Palghar News: क्रीडा विश्वावर शोककळा! आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू

International Shooter Sambhaji Patil Dies : संभाजी पाटील पुण्याहून गुजरातच्या दिशेने प्रशिक्षणासाठी जात होता. पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्वेश गावाजवळ, त्याची भरधाव फॉर्च्युनर कार एका उभ्या असलेल्या अवजड हयावा ट्रकला पाठीमागून जोरदार धडकली.

जाहिरात
Read Time: 2 mins
International Shooter Sambhaji Patil Dies

भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारा प्रतिभावान नेमबाज संभाजी शिवाजी पाटील (वय 27) याचा अपघाती मृत्यू झाला आहे.  मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोरजवळ संभाजी पाटीलचा भीषण कार अपघात झाला. सोमवारी (9 फेब्रुवारी) सकाळी 10 ते 11 च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात फॉर्च्युनर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

अपघाताचा थरार

संभाजी पाटील पुण्याहून गुजरातच्या दिशेने प्रशिक्षणासाठी जात होता. पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्वेश गावाजवळ, त्याची भरधाव फॉर्च्युनर कार एका उभ्या असलेल्या अवजड हयावा ट्रकला पाठीमागून जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पुढचा भाग ट्रकच्या खाली घुसला आणि गाडीचा चेंदामेंदा झाला.

(नक्की वाचा-  Mumbai News: मुंबईत गाडी चालवण्यासाठी भरावा लागणार 'कंजेश्चन टॅक्स'? भाजप नेत्याचा BMC ला प्रस्ताव)

अपघात कशा घडला?

अपघातात संभाजी पाटील याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला मित्र प्रणय (यश) प्रशांत चौधरी (वय 22) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी मुंढे करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा उभ्या ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मूळचा छत्रपती संभाजीनगरचे असलेले संभाजी पाटील बालेवाडी क्रीडा संकुलात क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याने नेमबाजीमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके पटकावली होती.

Advertisement

(नक्की वाचा-  Solapur ZP Result: राम सातपुतेंनी वचपा काढला! मोहिते-पाटील अन् जानकरांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा गुलाल)

संभाजी पाटील नेमबाजीतील कारकीर्द

  • 2016- कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत (गबाना) सुवर्णपदक.
  • 2017 - कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत सांघिक रौप्य पदक.
  • 2018-20 - ऑल इंडिया रेल्वे आणि मध्य रेल्वे नेमबाजी स्पर्धांमध्ये सातत्याने सुवर्णपदके.
  • अलीकडेच त्याची पुन्हा एकदा राष्ट्रीय नेमबाज म्हणून निवड झाली होती.
     
Topics mentioned in this article