Petrol Diesel: पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार? LPG गॅसचा साठा संपलाय? काय आहेत सत्य? वाचा सरकारचा मोठा निर्णय

Petrol Diesel Prices: इराण-अमेरिका तणावामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढत असताना भारत सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत मोठा खुलासा केला आहे. 12 मार्च 2026 चे प्रमुख शहरांतील इंधन दर आणि सरकारच्या स्पेशल बॅकअप प्लॅनबद्दल सविस्तर वाचा.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Petrol Diesel Prices: मुंबई, पुण्यासह राज्यात पेट्रोल दरवाढ होणार?"
ANI

Petrol Diesel Prices: इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडत असल्याने भारतातही पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढणार का? अशी भीती सर्वसामान्य जनतेला सतावत आहे. पण सरकारने यावर मोठे अपडेट देत कोट्यवधी देशवासीयांची चिंता दूर केली आहे.  

पेट्रोल-डिझेलचे दर राहणार स्थिर? | Petrol Diesel Prices News

सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या मोठ्या बातमीनुसार, जागतिक बाजारपेठेत सुरू असलेल्या उलथापालथीनंतरही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या स्थिर राहणार आहेत. दरवाढीच्या चर्चांदरम्यान सरकारने स्पष्ट केले आहे की, सध्या तरी किमती वाढवण्याची कोणतीही योजना नाही. त्यामुळे जर तुम्ही आज तुमच्या गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी जात असाल, तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.

Advertisement

सरकारच्या आश्वासनानंतर 12 मार्च 2026 रोजी देशातील विविध शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे आहेत

  • दिल्ली : पेट्रोल 94.77 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 87.67 रुपये प्रति लिटर 
  • मुंबई : पेट्रोल 103.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.03 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता : पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.02रुपये प्रति लिटर 
  • चेन्नई: पेट्रोल 100.93 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.48 रुपये प्रति लिटर 
  • बंगळुरू: पेट्रोल 102.92 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.99 रुपये प्रति लिटर 

मिडल ईस्टवरील निर्भरता झाली कमी

इंधन पुरवठा खंडित होण्याची भीती ओळखून भारताने आधीच तयारी केली आहे. 'होर्मुज सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) या मार्गावरील निर्भरता कमी करण्यासाठी भारताने इतर क्षेत्रांतून तेल आयात करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी भारत आपल्या गरजेच्या 60 टक्के तेल या मार्गावरून मागवत असे, पण आता 70 टक्के पुरवठा हा इतर सुरक्षित मार्गांकडे (Non-Hormuz regions) वळवण्यात आला आहे.

(नक्की वाचा: Iran War: परराष्ट्रमंत्र्यांच्या एका फोनमुळे मोठा दिलासा; 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ'मधून भारतीय जहाजांना परवानगी)

तेल पुरवठ्यासाठी सरकारची खास योजना | Central Government News

कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकारने 'फ्युअल सप्लाय मॅनेजमेंट चेन प्रोग्राम' सक्रिय केला आहे. आता भारताने मिडल ईस्ट व्यतिरिक्त इतर देशांकडून तेल आणि वायूचे स्त्रोत शोधणे सुरू केले आहे. पूर्वी जेथे 40 टक्के पुरवठा केवळ मिडल इस्टमधून होत असे, आता त्याचे फेरबदल (Diversification) केले जात आहे, जेणेकरून युद्धाचा परिणाम भारतावर होऊ नये.

(नक्की वाचा: Pune News: पुण्यातील प्रसिद्ध बादशाही हॉटेल बंद, कधी होणार सुरू? का घेतला निर्णय? व्हायरल फोटोमुळे चिंता वाढली)

Photo Credit: NDTV Marathi

LPGची टंचाई नाही, घरगुती ग्राहकांना प्राधान्य

देशातील कोणत्याही एलपीजी (LPG) वितरकाकडील साठा संपलेला नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे. घरगुती ग्राहक ही सरकारची पहिली प्राथमिकता असून घराघरांत गॅस सिलिंडर पोहोचत राहावे, यासाठी सरकारने कंबर कसली आहे. 

Advertisement