Pune News : आईशप्पथ! पुणे आहे की शिमला? Video पाहून नागरिक हैराण!

Pune Rain : हा व्हिडिओ पाहून पुणे आहे की शिमला असा संभ्रम निर्माण होत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, प्रतिनिधी

Pune Rain Alert : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसासह अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील आयटी नगरी हिंजवडी परिसरामध्ये चक्क  गारपिटीचा पाऊस झाला आहे. याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून पुणे आहे की शिमला असा संभ्रम निर्माण होत आहे.  हवामान विभागाने यापूर्वीच पुण्याला अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवविला होता. हिंजवडीसह पुण्याच्या अन्य भागातही गारांचा पाऊस पडल्याची माहिती आहे. 

गारपिटीने आंबा आणि द्राक्षाचं नुकसान

उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात अनेक भागात अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली असून या गारपिटीने आंबा व द्राक्ष पिकाचे नुकसान होणार आहे, या परिसरात सध्या कांदा पिकाची काढणी सुरू असून मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने काढलेला कांदा सडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

Advertisement

नक्की वाचा - Pune News : पुण्यातील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम बदलणार? कारण काय?


पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाच्या जोरदार सरी


सकाळपासूनच कडक ऊन पडल्याने उकाडा प्रचंड वाढला होता. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास आकाशात ढगांनी गर्दी केली आणि वातावरणात अचानक बदल झाला. पिंपरी-चिंचवडमधील काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असली, तरी उकाड्यापासून सुटका झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, पावसामुळे काही प्रमुख चौकांमध्ये वाहतूक संथ होऊन काही काळ विस्कळीत झाली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांतही शहरात अशाच प्रकारच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नंदुरबारमध्येही गारपिट...


नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ आणि परिसरातल्या गावांना अवकाळी पावसाने झोड़पल्याचे चित्र आहे. या भागात गारपीटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने जिल्ह्यातील काही भागात तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अशातच दुपारपासून जिल्हाभरात असह्य उकाडा आणि  वातावरण पहायला मिळत होते. चार वाजेनंतर नंदुरबार तालुक्यातील पुर्व पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनिमांडळ आणि परिसरतील गावात गारपिटीचा पाऊस पाहायला मिळाला आहे.