Mumbai News: 4 वर्षांचा मुलगा होता मरणाच्या उंबरठ्यावर! अख्ख्या कुटुंबाची वाढली होती धाकधूक, कसा वाचला जीव?

मुंबईतून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देवदूत बनलेल्या डॉक्टरांनी 4 वर्षांच्या चिमुकल्याचा वाचवला जीव..काय घडलं होतं?

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Trending News
मुंबई:

Mumbai Trending News : मुंबईतून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रस्ता ओलांडत असताना वैभव मिश्रा (4) या चिमुकल्याला एका भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली होती. या अपघातात वैभव गंभीर जखमी झाला होता. वैभव पूर्णपणे रक्तबंबाळ झाला होता आणि त्यानंतर तो बेशुद्ध झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी वैभवला तातडीनं जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, वैभवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता. तसच त्याच्या शरीरावरही जखमा झाल्या होत्या. डॉ.सचना शेट्टी (आपत्कालीन विभागाच्या कन्सलटन्ट)आणि डॉ. सुनील जैन (हेड इमरजन्सी सर्विसेस)यांनी व त्यांच्यासोबत कार्यरत असलेल्या आपत्कालीन पथकाने त्वरित पेडियाट्रिक ट्रॉमा प्रोटोकॉल सुरू केला.त्यामध्ये मेरुदंड स्थिरीकरण,श्वसनमार्गाच्या व्यवस्थापनासाठी एंडोट्रॅकियल इंट्युबेशन आणि द्रव पुनर्प्राप्तीचा समावेश होता.

वैभव मिश्राला झाली होती गंभीर दुखापत

वैभवला गंभीर दुखापत झाल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं.दोन्ही फुफ्फुसांमध्ये अनेक जखमा व मेंदूतील रक्तस्राव आणि डिफ्युज सेरेब्रल एडेमा यांच समावेश होता. अतिरिक्त जखमांमध्ये क्लॅव्हिकल,मँडिबल आणि पहिल्या बरगडीला फ्रॅक्चर,उजव्या बाजूचा न्यूमोथोरॅक्स यांचा समावेश होता.या सर्व गोष्टी मेंदू,मेरुदंड,छाती आणि पोटाच्या सीटी स्कॅनद्वारे निदर्शनात आल्या.त्याला डिफ्यूज्ड अॅक्सोनल इंज्युरी असल्याचाही संशय होता आणि नंतर एमआरआय ब्रेन रिपोर्ट्सद्वारे हे स्पष्ट झालं.

नक्की वाचा >> ऋतिकसोबत बॅकग्राऊंड डान्सर, 'तो' 27 वर्षात बनला सुपरस्टार, 34 व्या वर्षी मृत्यू, TV अभिनेत्रीसोबत होतं लफडं..

वैभवच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती 

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या अपघात आणि आपत्कालीन विभागाच्या कन्सलटन्ट डॉ. सचना शेट्टी यांनी सांगितले की, "वैभवला आणलं गेलं तेव्हा तो पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होता.त्याच्या श्वसनमार्गात बिघाड झाल्याची लक्षणे दिसत होती. श्वसनमार्ग सुरक्षित करणे आणि रुग्णाला हेमोडायनामिकदृष्ट्या स्थिर करणे हे आमचे ध्येय होते. ट्रॉमा इमेजिंगद्वारे लवकर निदान झाल्याने पुढे कोणत्या प्रकारचा उपचार करायचा हे ओळखण्यात आणि अधिक गुंतागुंत टाळण्यात खूप मदत झाली."

Advertisement

नक्की वाचा >>  90 च्या दशकातील 'ऐश्वर्या', 31 वर्षानंतर 'हा' फोटो झाला व्हायरल! लोक म्हणाले, "आजही राजकुमारीच.."

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या बालरोग विभागाचे कन्सल्टंट डॉ. शहला काझी म्हणाले की, "वैभवची स्थिती अत्यंत गंभीर होती. त्याला त्वरित आयव्ही द्रव, आयव्ही प्रतिजैविके, अँटीकन्ल्व्हसंट्स, इंट्राक्रॅनियल दाब व्यवस्थापनासाठी औषधे आणि सेडेटिव्ह अॅनाल्जेसिया सुरू करण्यात आले. एमआरआय निष्कर्षांद्वारे नंतर ग्रेड ३ डीएआयचे निदान असल्याचे सुनिश्चित झाले, त्यामुळे वेळीच पेडियाट्रिक ट्रॉमा केअर, न्यूरोप्रोटेक्टिव्ह उपचार आणि सहाय्यक वैद्यकीय सेवा यामुळे न्यूरोलॉजिकल सिस्टीम स्थिर करण्यात मदत झाली".