तंत्रज्ञान आणि नाविन्य पुढे जाण्याचा एकमेव मार्ग, IIT टेक्सफेस्टमध्ये जीत अदाणींनी दिला मंत्र

मुंबईच्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी म्हणजेच IIT बॉम्बेमधील वार्षिक टेक्नॉलजी फेस्टिव्हल 'टेकफेस्ट 2024' चं मंगळवारी (17 डिसेंबर) रोजी उद्घाटन झालं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबईच्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी म्हणजेच IIT बॉम्बेमधील वार्षिक टेक्नॉलजी फेस्टिव्हल 'टेकफेस्ट 2024' चं मंगळवारी (17 डिसेंबर) रोजी उद्घाटन झालं. 19 डिसेंबरपर्यंत हे फेस्टिव्हल सुरु असेल. या फेस्टिव्हलच्या उद्घाटन कार्यक्रमाला अदाणी समुहातील कंपनी अदाणी पोर्टचे  (Adani Airport Holdings) संचालक जीत अदाणी (Jeet Adani) यांनी संबोधित केलं. 

अदाणी समुहाचे प्रमुख गौतम अदाणी यांचे चिरंजीव जीत अदाणी यांनी वेगानं बदलत असलेल्या जगात तंत्रज्ञान आणि नाविन्याची भूमिका महत्त्वाची असल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की, सध्याचा काळ हा तंत्रज्ञानाला आत्मसात करुन प्रगती करण्याचा आहे. तंत्रत्रान आणि नाविन्य हाच आयुष्यात पुढं जाण्याचा एकमेव मार्ग आहे. 

जीत अदाणी यांनी सांगितलं की, 'अक्षय्य ऊर्जा क्षेत्रातील अदाणी समुहाच्या हवामान बदलाविषयातील लढ्याचं यशोगाथेमध्ये रुपांतर होत आहे.' 

IIT बॉम्बेची प्रशंसा करताना ते म्हणाले, 'या इंस्टीट्यूटनं जगाला अनेक बुद्धीमान व्यक्ती दिल्या आहेत. इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलकेणी, दिवंगत केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर, ISRO चे प्रमुख डॉ. दिगेंद्रनाथ स्वियन, संगणक शास्त्रज्ञ प्रणव मिस्त्री ही काही प्रमुख उदाहरणं आहेत. त्याचबरोबर OLA चे भाविश अग्रवाल, ट्विटर (X) चे पराग आणि दिवंगत फिजिसिस्ट डॉ. रोहिणी गोडबोले यांच्यासाखक्या व्यक्तीहीही IIT बॉम्बेची देणगी आहेत. 

( नक्की वाचा : Gautam Adani Success Story : 16 व्या वर्षी पहिल्यांदा सीमा ओलांडली, गौतम अदाणींनी सांगितलं यशाचं रहस्य )
 

अदाणी पोर्ट्सचे संचालक जीत अदाणी यांनी सांगितलं की, 'मी सध्याच्या काळात तंत्रज्ञान हाच पुढं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं मानतो. तुम्ही तंत्रज्ञानाशिवाय आयुष्याची कल्पनाही करु शकत नाही. एक आठवड्यापूर्वी Google नं विलो नावाची एक नवी क्वांटम कॉमप्युटीग चीप लाँच केली आहे. ही चीप चांगलीच शक्ती शाली आहे. आपल्याला माहिती असलेल्या आणि जगात पाहिलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा हे अधिक उच्च तंत्रज्ञान आहे. 

Advertisement

जीत अदाणी यांनी सांगितलं की, 'जगभरातील सरकारं, कंपन्या तसंच बिझनेस समुह सुरुवातीपासून तंत्रज्ञानाच्या फायद्यासाठी आधीपासूनच कटिबद्ध आहेत. त्याचबरोबर व्यापक स्तरावर या विषयावर काम करत आहेत. 

त्यांनी पुढं सांगितलं की, 'पोर्ट आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात जगातील सर्वात आघाडीच्या समुहामध्ये अदाणी ग्रुपचा समावेश आहे. आम्ही आमच्या कामाची ठिकाणची सुरक्षितता आणि ऑपरेशन अधिक वेगानं करण्यासाठी क्रेन ऑपरेटर्स तसंच क्वे चेकर्स सारख्या जटिल भूमिकांसाठी सिम्युलेशन-आधारित प्रशिक्षणाचा वापर करतो. 

Advertisement


अदाणी समूह 7 आंतरराष्ट्रीय विमानतळाचं व्यवस्थापन करत आहे. आम्ही नवी मुंबईत एक नवं आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार करत आहोत. उत्तम नियोजन आणि कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करण्यााठी आमची तंत्रज्ञानावर भिस्त आहे. 
 

(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)

Topics mentioned in this article