शिक्षक दिनानिमित्त (Teacher's Day 2024) अदाणी ग्रुुपचे संचालक गौतम अदाणी यांनी (Gautam Adani) मुंबईच्या जयहिंद कॉलेजमधील एका कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. "Breaking Boundaries: The Power of Passion and Unconventional Paths to Success" ही या कार्यक्रमाची थीम होती. ' जे सीमा ओलांडतात तेच पुढे जातात. मी 16 व्या वर्षी पहिल्यांदा सीमा ओलांडली होती. अहमदाबादमधील शिक्षण सोडून मी मुंबईत आलो. अहमदाबादसोडून मुंबईत का आलो? असं लोकं मला आजही विचारतात. मुंबई माझ्यासाठी फक्त शहर नाही. तर माझ्या व्यवसायाचं ट्रेनिंग सेंटर देखील आहे. मुंबईनं मला मोठा विचार करण्यास शिकवलं.' असं अदाणी यांनी सांगितलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अदाणी यांनी सांगितलं, 'मी 19 व्या वर्षी मोठ्या भावासोबत व्यवसाय करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मला भारतामध्ये व्यवसाय करण्याचं आव्हान लक्षात आलं. परवाना पद्धत शिथील करण्याची गरज आहे, हे मला 1981 ते 1991 दरम्यान लक्षात आलं होतं. पंतप्रधान मोदी 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर त्यांनी अनेक सुधारणा केल्या आहेत. ही वर्ष भारताच्या विकासात मैलाचे दगड ठरले. हा बदलत्या भारताचा पाया आहे, असं मला जाणवलं. केंदात मोदी सरकार आल्यानंतर 2 वर्षांमध्ये आम्ही देशातील सर्वात मोठी व्यापारी संस्था होतो.'
जितकी मोठी सीमा ओलांडाल, तितकी कमी स्पर्धा
गौतम अदाणी म्हणाले, 'तुम्ही जे स्वप्न पाहात तेच पूर्ण करता. तुम्ही जितकी मोठी सीमी ओलांडाल तितकी कमी स्पर्धा असते. वर्तमान परिस्थितीवर टीका करणे सोपं आहे. पण त्यामध्ये सुधारणा करणे तितकंच अवघड आहे. पण, जे हे आव्हान पार करतात त्यांनाच यश मिळतं.'
हिंडनबर्ग रिसर्च हल्ला म्हणजे...
हिंडनबर्ग रिसर्चवर गौतम अदाणी यांनी सांगितलं, 'आर्थिक हल्ल्यानंतर आम्ही धैर्य दाखवलं. हा फक्त आर्थिक हल्ला नव्हता. हा दुतर्फा वार होता. आमचं जास्तीत जास्त नुकसान करणे हा याचा हेतू होता. आम्ही सर्वात खराब काळात सर्वात चांगला व्यवसाय केला. या हल्ल्याच्या दरम्यान आमचे रेकॉर्ड आमच्या क्षमतेचे निदर्शक ठरले.'
अदाणी समूह मुंबईजवळ असलेल्या धारावी या आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा पुनर्विकास करत आहे. याचा संदर्भ देत अदाणी म्हणाले, 'धारावी हे मानवाच्या प्रतिष्ठेबद्दल आहे. आमच्या व्यवसायाची शक्ती हे त्याचे एकात्मिक मॉडेल आहे.'
( नक्की वाचा : मोठी बातमी : अदाणी समुहाच्या मदतीनं पनवेलमध्ये उभा राहणार अतिविशाल सेमी कंडक्टर प्रकल्प )
'डिजिटल हे भविष्य'
पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडियाची प्रशंसा करताना अदाणी म्हणाले, 'जगाला आपल्या डिजिटल स्ट्रक्चरचा हेवा वाटतो. कारण डिजिटल हेच भविष्य आहे. त्याचं नेतृत्त्व भारताच्या हातामध्ये आहे.'
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world