Kalyan News: शरीर सुखापासून दूर, पत्नीची पोलिसात धाव; उच्चशिक्षित कुटुंबातील छळाचा अजब प्रकार

Kalyan Crime News: कल्याणमध्ये मर्चंट नेव्हीमधील पती शारीरिक सुख देऊ शकत नसल्याने पत्नीने खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. सासू-सासऱ्यांकडूनही छळ होत असल्याचा आरोप या उच्चशिक्षित महिलेने केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Kalyan Crime News: कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौटुंबिक हिंसाचाराची एक विचित्र घटना समोर आली आहे. पती शारीरिक सुख देण्यास असमर्थ असल्याच्या कारणावरून एका विवाहितेने पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील पती हा मर्चंट नेव्हीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे, तर पत्नी एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करत आहे.

हनीमूनपासूनच वादाची ठिणगी

तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याचे लग्न झाल्यानंतर ते हनीमूनसाठी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. तिथेही पतीने पत्नीला शारीरिक सुख दिले नाही. पत्नीने प्रेमाच्या गोष्टी केल्यावर पती चिडचिड करायचा आणि किरकोळ कारणावरून भांडण उकरून काढून तिला स्वतःपासून दूर लोटत असे. पती सहा महिने नोकरीनिमित्त परदेशात आणि सहा महिने घरी असायचा. या काळात दोघांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासण्याही केल्या. पत्नीने पतीला धीर देत उपचारांसाठी प्रोत्साहन दिले, मात्र पतीच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही.

(नक्की वाचा-  Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)

मारहाण आणि सासू-सासऱ्यांकडूनही त्रास

पत्नीचा असा आरोप आहे की, सहा महिन्यांनी घरी परतल्यानंतरही पती तिला जवळ न घेता उलट शिवीगाळ आणि मारहाण करायचा. या सर्व प्रकाराबद्दल जेव्हा पीडित महिलेने आपल्या सासू-सासऱ्यांना माहिती दिली, तेव्हा त्यांनी मुलाची चूक सुधारण्याऐवजी त्याचीच बाजू घेतली आणि सुनेला त्रास देण्यास सुरुवात केली. वारंवार होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर या महिलेने पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि पोलिसांत धाव घेतली.

(नक्की वाचा-  Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमान अपघाताचं गुढ उकलणार? रोहित पवार मोठा निर्णय घेणार? दिल्लीत हालचाली)

खडकपाडा पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. पतीने पत्नीचा हा अधिकार नाकारणे आणि त्यावरून तिला मारहाण करणे हे कौटुंबिक हिंसाचाराच्या कक्षेत येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पोलीस आता या प्रकरणातील तांत्रिक आणि वैद्यकीय बाबींचा तपास करत आहेत.
 

Advertisement
Topics mentioned in this article