Kalyan News: दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणीची घरात घुसून हत्या, वडील गंभीर जखमी; 5 जणांना अटक

Kalyan Crime News: कल्याण पश्चिमेतील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद राहतात. याच परिसरात गुलाम शेख नावाचा व्यक्ती राहतो.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमजद खान, कल्याण

Kalyan Crime News : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पाच जणांनी घरात घुसून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करायला गेलेल्या एका 19 वर्षीय तरुणीचा यामध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. मयत मुलीचे नाव सानिया बागवान असे आहे. या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कल्याण पश्चिमेतील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद राहतात. याच परिसरात गुलाम शेख नावाचा व्यक्ती राहतो. गुलाम शेख याने निसार सय्यद यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. निसार सय्यद यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून गुलाब शेख आणि निसार सय्यद यांच्यामध्ये किरकोळ वाद देखील झाला. 

(नक्की वाचा-  मुलासमोरच बायकोला संपवलं, विल्हेवाट लावताना फसला अन् पोलिसांना सापडला)

या वादानंतर निसार सय्यद घरी निघून गेले. निसार सय्यद कुटुंबासह घरात जेवण करत असताना गुलाम शेख याचा मुलगा अब्दुल घरात आला. त्यांनी निसार यांना वडिलांसोबत वाद का घातला याबाबत जाब विचारला. यावरून अब्दुलने निसार सय्यद यांना लाकडी दांडक्याने मारहाण सुरू केली. या मारहाणीदरम्यान निसार यांची मुलगी सानिया बागवान मध्यस्थी करायला आली. 

मध्यस्थी करत असताना गुलाम शेख अब्दुल यांने आणि परिसरात राहणाऱ्या शोएब शेख, अजित शेख, आणि शाहिद शेख यांनी वडील आणि मुलीला मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणी दरम्यान सानिया बागवान हिचा मृत्यू झाला. तर निसार सय्यद हे गंभीर जखमी झाले. 

Advertisement

(नक्की वाचा-  Railway News : मुंबईत मेट्रोनंतर जमिनीखालून धावणार रेल्वे? परेल-CSMT मार्गावर विचार सुरु)

घटनेची माहिती मिळताच कल्याणचे महात्मा फुले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात एक तासाच्या आत कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सानिया बागवान हिची हत्या करणाऱ्या पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र दारूसाठी पैसे मागितल्यानंतर झालेल्या वादात एका तरुणीची हत्या झाल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आली आहे.

Topics mentioned in this article