Kalyan-Dombivali Municipal Corporation Latest News : हवेची गुणवत्ता खालावल्याने उच्च न्यायालयाने राज्यसरकारसह स्थानिक स्वराज्य संस्थांना चांगलेच फटकारले होते. न्यायालयाने हवेची गुणवत्ता सुधारण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या मार्गदर्शनक सूचनांचे पालन करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेनं एमसीएचआय बिल्डर संघटनेची आज गुरुवारी बैठक घेतली. न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शनक सूचनांचे पालन करुन हवेची गुणवत्ता सुधारण्याची उपाययोजना तातडीने करावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. जर या सुचनांचे पालन केले नाही, तरदंड भरण्यास तयार राहा, असा इशाराच केडीएमसीने बिल्डरांसह मेट्रो आणि एमएमआरडीचेच्या कंत्राटदारांना दिला आहे.
महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक नगररचनाकार संतोष डोईफोडे, पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्या रोहिणी लोकरे,घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी बिल्डरांसोबत बैठक घेतली. महापालिका हद्दीत गृहनिर्माण प्रकल्प सुरु आहे. त्याचबरोबर मेट्रो रेल्वेचे आणि एमएमआरडीएची रस्ते विकासाची कामे सुरु आहेत. त्यामुळे शहरात धुळ पसरत असून हवेची गुणवत्ता खराब होत आहे.
नक्की वाचा >>कल्याण-डोंबिवली महापालिकेत चाललंय तरी काय? महापौर-उपमहापौरांना ना गाडी, ना चालक, ना सुरक्षा रक्षक..कारण काय?
3 बिल्डरांना प्रत्येकी 50 लाखाचा दंड
बिल्डरांनी त्यांच्या बांधकामाच्या साईटवर 25 फूट उंचीचे पत्रे मारावेत. बिल्डरांची बांधकाम साईट 1 एकरपेक्षा जास्त असल्यास 35 फूटाचे पत्रे मारुन साईट बंदिस्त करावी. त्याठिकाणी ग्रीननेट,ताडपत्री लावण्यात यावी. धूळ उडणार नाही त्यासाठी पाण्याचा फवारा करावा. धूळीचे प्रमाण दिलेल्या निकषानुसार असावे, अशा सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन बिल्डरांनी केले नाही, तर त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यापूर्वी महापालिकेने 3 बिल्डरांना प्रत्येकी 50 लाखाचा दंड आकारला होता. मुंबई महापालिका हद्दीत तर दंडाची रक्कम 5 कोटी होती.
नक्की वाचा >> भविष्यात मुंबई–पुणे 'एक्स्प्रेस वे'वर ट्रॅफिक जॅम होणार नाही? तज्ज्ञांचा सरकारला मोठा सल्ला, खासगी गाड्यांवर..
केडीएमसीने काय केली उपाययोजना?
धूळीमुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे.1 फेब्रुवारीला कल्याण डोंबिवलीतील एअर क्वालीटी इंडेक्स 126,2 फेब्रुवारीला 126, 3 फेब्रुवारीला 95 आणि 4 फेब्रुवारीला 99 इतका होता. गेल्या तीन दिवसात महापालिकेने धूळीचे प्रमाण कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. महापालिकेच्या 10 प्रभागात 10 पथके नेण्यात आली आहेत. धूळ आणि कचरा शोषूण घेणारी 10 यंत्रे आणि 6 धूळ शमन यंत्रे कार्यान्वित आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world