जाहिरात

Kalyan News: KDMC चे महापौर- उपमहापौर बसणार कुठे? दालनाची डागडूजी अजून ही सुरूच

जर दालनाचे काम वेळेत पुर्ण झाले नाही तर नवनिर्वाचीत महापौर आणि उपमहापौर कुठे बसणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Kalyan News: KDMC चे महापौर- उपमहापौर बसणार कुठे? दालनाची डागडूजी अजून ही सुरूच
  • कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी झाली असून मतमोजणी १६ तारखेला पार पडली होती
  • महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे
  • महापौर आणि उपमहापौरांसाठी आरक्षित दालनाची डागडुजी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे बसण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
कल्याण:

अमजद खान 

कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी झाली. मतमोजणी 16 जानेवारी रोजी पार पडली. महापौरसाठी आरक्षण 22 जानेवारी रोजी जाहीर झाले. 30 तारखेला उमेदवारी अर्ज भरले गेले. केडीएमसी  महापौर  आणि उपमहापौरपदाची निवडणूक  3 फेब्रुवारी रोजी  12 वाजता वाजता पार पडणार आहे. मात्र केडीएमसी प्रशासनाला महापौर आणि उपमहापौरांच्या दालनाची डागडुजी करण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुले महापौर निवडीनंतर ते बसणार कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

दालनाच्या डागडुजीचे काम उद्या पहाटेपर्यंत सुरू राहणार आहे, ही बाब समोर आली आहे. हे काम 12 वाजेपर्यंत पूर्ण होणार की नाही याची कोणती ही हमी देण्यात आलेली नाही असं राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. प्रशासनाकडून ही अधिकृत त्याबाबत काही भाष्य करण्यात आलेले नाही. उद्या मंगळवारी सहा वर्षानंतर नगरसेवक महापौर उपमहापौर इतर प्रमुख अतिथी केडीएमसीमध्ये उपस्थित राहणार आहेत. 

नक्की वाचा - Budget 2026: काय स्वस्त? काय महाग? दारू महागली, विमानाचे पार्ट स्वस्त, पाहा संपूर्ण लिस्ट

जर दालनाचे काम वेळेत पुर्ण झाले नाही तर नवनिर्वाचीत महापौर आणि उपमहापौर कुठे बसणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणूक होऊन 18 दिवस उलटले तरी दालनाची डागडुजी झाली नाही, ती का झाली नाही याची चर्चा आता सुरू झाली आहे. या सर्व कारभाराला जबाबदार कोण अशी विचारणा ही केली जात आहे. केडीएमसीच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणुकीवेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. 

नक्की वाचा - Shocking news: बाप रे! एक मिरची 5,000 रुपयांना! हिरव्या मिरचीचा 'तिखट' कारनामा पाहून पोलीसही हादरले

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदासाठी शिंदेसेनेच्या हर्षाली थवील-चौधरी आणि उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. या दोन्ही उमेदवारांसमोर अन्य कोणचाही अर्ज प्राप्त झालेला नसल्याने या दोन्ही पदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. महापालिकेच्या महासभेत दुपारी १२ महापौर आणि उपमहापौरांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com