KDMC News: 'तुम्ही 1 कार्यकर्ता फोडाल तर आम्ही 4 फोडू!' कल्याण-डोंबिवलीत महायुतीत अचानक काय घडले?

KDMC News: मित्रानेच पाठीत खंजीर खुपसल्याच्या भावनेने संतप्त झालेल्या भाजपाने आता अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
KDMC News: कल्याण डोंबिवली महापालिकेतील युतीचा धर्म धोक्यात आला आहे. 
कल्याण:

KDMC News: कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात सत्ताधारी महायुतीतील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत.शिवसेनेनं (एकनाथ शिंदे गट) गुरुवारी   भाजपाच्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देत पहिली ठिणगी टाकली होती.. मित्रानेच पाठीत खंजीर खुपसल्याच्या भावनेने संतप्त झालेल्या भाजपाने आता अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून, तुम्ही आमचा 1 फोडाल तर आम्ही तुमचे 4 फोडू, असा थेट इशाराच  भाजपानं दिला आहे. दोन्ही पक्षांच्या ताठर भूमिकेनं कल्याण डोंबिवली महापालिकेतील युतीचा धर्म धोक्यात आला आहे. 

नेमकं काय घडलं?

गुरुवारी रात्री डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा एक मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात कल्याण पूर्वेतील भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी चंद्रशेखर म्हात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटाचा भगवा हाती घेतला. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा पक्षप्रवेश भाजपसाठी खूप मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या एकाच घटनेमुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत.

Advertisement

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये भाजपाला घरचा आहेर! मित्रपक्षानेच पाडले खिंडार, निष्ठावंतांचा पक्षाला राम राम ! )
 

भाजपा सोडून शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या चंद्रशेखर म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्ष सोडण्यामागची आपली खंत उघडपणे बोलून दाखवली. भाजपामध्ये असताना आमची कोणतीही कामे केली जात नव्हती, अशी उघड तक्रार त्यांनी केली. 

स्थानिकांची कामे घेऊन जेव्हा आम्ही भाजपचे आमदार किंवा नगरसेवक यांना फोन करायचो, तेव्हा कोणीही आमचा फोन उचलत नव्हते. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत आणि लोकांची कामे व्हावीत याच एकमेव हेतूने आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असा दावा म्हात्रे यांनी केला.

( नक्की वाचा : Dombivli News: कामाची सोय करतो सांगून कुठे घेऊन गेले? डोंबिवलीच्या हतबल मुलीसोबत घडला संतापजनक प्रकार! )

'तुम्ही 1 फोडाल तर आम्ही 4 फोडू'

महायुतीचा करार झालेला असतानाही मित्रपक्षच आमचे कार्यकर्ते पळवत असल्याचा राग भाजपच्या गोटात निर्माण झाला आहे. या पक्षप्रवेशानंतर भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत शिंदे गटाला थेट इशारा दिला आहे. महायुतीचा धर्म पाळण्याचा करार झालेला असताना जर शिवसेना आमचे कार्यकर्ते फोडणार असेल, तर सुरुवात त्यांनी केली आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. तुम्ही आमचा 1 कार्यकर्ता फोडला तर आम्ही तुमचे 4 कार्यकर्ते फोडू, असे वक्तव्य करत परब यांनी थेट युतीलाच आव्हान दिले आहे.

या पक्षप्रवेशाच्या घटनेमुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिवसेनेत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. स्थानिक पातळीवरील हा वाद आता वरिष्ठ पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील राजकीय रणनीती ठरवण्यासाठी शनिवारी भाजप कोर कमिटीची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत भाजप काय कठोर निर्णय घेणार आणि या वादाचा परिणाम आगामी पालिका निवडणुकीच्या युतीवर कसा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement

Topics mentioned in this article