Kalyan News: कल्याणच्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! 3,667 जणांना मिळणार दिवाळीपूर्वी भरपाई

Kalyan Farmers Compensation Before Diwali: सप्टेंबर महिन्यात कल्याण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) भातशेतीचे (Paddy Crop) मोठे नुकसान झाले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan News: कल्याण तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कल्याण:

Kalyan Farmers Compensation Before Diwali: सप्टेंबर महिन्यात कल्याण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) भातशेतीचे (Paddy Crop) मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या सर्व शेतकऱ्यांना दिवाळी (Diwali) सणापूर्वी नुकसान भरपाई (Compensation) मिळणार असल्याची माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ (Sachin Shejal, Tehsildar) यांनी दिली आहे.

किती झालं होतं नुकसान?

तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे कल्याण तालुक्यातील भातशेतीला मोठा फटका बसला होता. या अतिवृष्टीमुळे तालुक्यामधील जवळपास 875 हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे.

3,667 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण

या नुकसानीचे त्वरित पंचनामे (Panchnama/Assessment) करण्याचे काम कल्याण तहसील कार्यालयाकडून हाती घेण्यात आले होते. कल्याण तालुक्यातील महसूल विभाग (Revenue Department), ग्रामपंचायत कार्यालय (Gram Panchayat Office) आणि तालुका कृषी अधिकारी (Taluka Agriculture Officer) यांच्या संयुक्त पथकाने भातशेतीचे नुकसान झालेल्या एकूण 3,667 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण केले आहेत आणि त्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत.

( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीच्या रस्त्यावर थरार! कडेवर बाळाला घेऊन महिला फेरीवाल्याने अंगावर डिझेल ओतले; कारण... )

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी सणापूर्वीच नुकसान भरपाईची रक्कम वितरित केली जाणार आहे. यामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article